सोनंखरेदीचा हा नियम पाळा नाहीतर होईल 1 लाखांचा दंड आणि तुरुंगवास

सोनंखरेदीचा हा नियम पाळा नाहीतर होईल 1 लाखांचा दंड आणि तुरुंगवास

तुम्ही जर सोन्याच्या खरेदीचा प्लॅन बनवत असाल तर या नियमाबद्दल नीट वाचा. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी BIS हॉलमार्किंग सक्तीचं केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : तुम्ही जर सोन्याच्या खरेदीचा प्लॅन बनवत असाल तर या नियमाबद्दल नीट वाचा. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी BIS हॉलमार्किंग सक्तीचं केलं आहे. हा नियम पाळला नाही तर 1 लाखांचा दंड आणि एक वर्ष तुरुंगवासही होऊ शकतो.

यासाठीची अधिसूचना सरकार 15 जानेवारी 2020 ला जारी करणार आहे. त्याशिवाय त्या सोन्याच्या किंमतीच्या पाचपट किंमत द्यावी लागेल, अशी तरतूदही करण्यात आली आहे.

एक वर्षाची मुदत

सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी सराफांना एक वर्षाची मुदत दिली जाईल. ग्राहकांना शुद्ध सोनं मिळावं यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. सरकारने हा नियम लागू केल्यानंतर BIS हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. सोन्याचं हॉलमार्किंग केलं तर सोन्यामध्ये किती प्रमाणात शुद्ध सोनं आणि आणखी कोणते धातू आहेत याबद्दल माहिती मिळू शकते. हॉलमार्किंगसाठी सराफांना परवाने घेणं आवश्यक आहे.

(हेही वाचा : भारताचा GDP आला 4.6 टक्क्यांवर, गेल्या 6 वर्षांतला नीचांकी दर)

ही घ्या खबरदारी

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

कच्चं बिल नको

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

======================================================================================

First published: November 29, 2019, 8:08 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading