Home /News /money /

Gold Price Today : सोने दरात 247 रुपयांची वाढ, तर चांदीचा भावही 800 हून अधिकने वधारला

Gold Price Today : सोने दरात 247 रुपयांची वाढ, तर चांदीचा भावही 800 हून अधिकने वधारला

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात आलेल्या तेजीचा परिणाम आज 9 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय सराफा बाजारात पाहायला मिळाला आहे. सोने दरात (Gold Price Today 9 February 2022) आज काहीशी तेजी आहे.

    नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात आलेल्या तेजीचा परिणाम आज 9 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय सराफा बाजारात पाहायला मिळाला आहे. सोने दरात (Gold Price Today 9 February 2022) आज काहीशी तेजी आहे. तर चांदीचा भावही (Silver price Today 9 February 2022) वधारला आहे. सोने दर 247 रुपयांनी वाढला असून 48,403 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात 825 रुपयांची वाढ झाली असून भारतीय बाजारात चांदीचा दर 62417 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. कमॉडिटी जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दरात सतत वाढ होण्याची अनेक कारणं आहेत. युक्रेन संकटाने जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तयार केलं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे. कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - 3 रुपयांचा शेअर पोहोचला 180 रुपयांवर! केवळ 2 वर्षात 1 लाखाचे झाले 59 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

    आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने दरात वाढ होत असून सोने दर 1,827 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव स्थिर आहे. चांदीचा रेट प्रति औंस 23.17 डॉलर आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितलं, की डॉलरच्या किमतीत कमी आल्याने तसंच यूएस बाँड यील्डमध्ये घसरण झाल्याने सोने दरात बुधवारी तेजी पाहायला मिळाली. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या