सोन्याच्या भावात मोठी वाढ! दर 53 हजारांपेक्षा जास्त, चांदीही वधारली

सोन्याच्या भावात मोठी वाढ! दर 53 हजारांपेक्षा जास्त, चांदीही वधारली

गेले काही दिवस सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दरानं 53 हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्यानं सोन्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. 2 जानेवारी रोजी सोन्याच्या दरात प्रती तोळा 190 रुपयांची वाढ झाली होती.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी: गेले काही दिवस सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दरानं 53 हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्यानं सोन्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. 2 जानेवारी रोजी सोन्याच्या दरात प्रती तोळा 190 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांत त्यात आणखी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 510 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 60 रुपये झाला आहे.

मुंबई, पुणे या शहरांमध्ये सोन्याचे दर देशातील अन्य ठिकाणच्या दरांपेक्षा चढे दिसून येतात. मुंबई, पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा 50 हजार 220 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी 49 हजार 220 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये देशातील सरासरी दराच्या तुलनेत सोन्याचा दर कमी असून तो 22 कॅरेटसाठी 49 हजार 220 रुपये प्रती दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 530 रुपये आहे. गोल्ड रिटर्न या वेबसाइटनुसार हे सोन्याचे दर आहेत

(हे वाचा-Opinion: कृषी सुधारणा कायदे कॉर्पोरेट्सच्या मदतीसाठी असं म्हणण्याची फॅशन आहे पण.)

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 520 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 40 हजार 70 रुपये झाला आहे. दिल्लीत 24 कॅरेट आणि 22 कॅरट सोन्याच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. असाच कल जयपूर आणि लखनऊमध्येही दिसून येत आहे.

देशातील काही महत्त्वाच्या शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)

कोलकाता : 50 हजार 510

बेंगळूरू : 47 हजार 300

सुरत : 49 हजार 680

हैद्राबाद : 47 हजार 300

(हे वाचा-EPFO मध्ये क्रेडिट होत आहे व्याज, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले का?)

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात 0.29 टक्क्यांनी म्हणजे 5.73 अमेरिकन डॉलर्सनी घसरण झाली असून, सोन्याचा दर 1938.23 डॉलर्स झाला आहे.

दरम्यान, चांदीचा भावही प्रति किलो 2 हजार 180 रुपयांनी वाढला असून, चांदीचा दर सोमवारच्या प्रति किलो 68 हजार 120 रुपयांवरून आज 70 हजार 300 रुपयांवर गेला आहे. चेन्नईत चांदीचा दर सर्वाधिक  म्हणजे किलोसाठी 74 हजार 100 रुपये नोंदला गेला आहे, तर बेंगळूरूमध्ये चांदीचा दर किलोमागं 69 हजार 600 रुपये आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 5, 2021, 11:05 AM IST

ताज्या बातम्या