सोन्याला झळाळी तर चांदी मात्र उतरली, वाचा काय आहेत आजचे भाव

सोन्याला झळाळी तर चांदी मात्र उतरली, वाचा काय आहेत आजचे भाव

गुरुवारी सोन्याच्या दरामध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. सोन्याचे भाव आज प्रति तोळा 68 रुपयांनी वधारले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जुलै : गुरुवारी सोन्याच्या दरामध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. सोन्याचे भाव आज प्रति तोळा 68 रुपयांनी वधारले आहेत. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यामध्ये झालेली वाढ आहे. त्याचप्रमाणे विविध शुद्धतेच्या सोन्याचे दरही बुधवारपेक्षा काहीशा फरकाने वाढले आहेत. दरम्यान आज चांदीमध्ये प्रति किलो 45 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

काय आहेत सोन्याचे नवे दर (Gold Rates on 16th July 2020)

24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यामध्ये 68 रुपयांची वाढ झाल्यानंतर सोन्याचे भाव आज प्रति तोळा 49318 रुपये आहे. तर 23 कॅरेट सोन्याची किंमत 67 रुपयांनी वाढली आहे, परिणामी या शुद्धतेच्या सोन्याचे दर 49120 रुपये प्रति तोळा झाले आहेत. त्याचप्रमामे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमती अनुक्रमे 45175 रुपये प्रति तोळा आणि 36989 रुपये प्रति तोळा झाली आहे.

काय आहेत चांदीचे नवे दर (Silver Rates on 16th July 2020)

बुधवारी चांदीचे भाव 52195 रुपये प्रति किलो होते. यामध्ये 45 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी आजचे चांदीचे भाव 52150 रुपये प्रति किलो झाले आहेत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion and Jewellers Association Ltd.) वेबसाइटनुसार हे दर आहेत. दरम्यान हे भाव जीएसटी वगळता आहेत. सकाळच्या सत्रातील एक सोन्या-चांदीचे भाव असून यामध्ये बाजार बंद होत असताना काहीसा बदल होऊ शकतो.

(हे वाचा-या बँकांनी बदलले मिनिमम बॅलन्स-व्यवहारासंदर्भातील नियम, 1 ऑगस्टपासून लागू होणार)

अर्थतज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा मोठा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरी सोन्याच्या किंमती कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 16, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading