Home /News /money /

Gold Rates Today: सलग पाचव्या दिवशी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत आजचे भाव

Gold Rates Today: सलग पाचव्या दिवशी स्वस्त झालं सोनं, वाचा काय आहेत आजचे भाव

Gold-Silver Rate: शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कमजोरी कायम आहे

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर (Gold Prices) घसरले आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी  एक्सचेंज (MCX- Multi-Commodity Exchange) वर सोन्याचे दर 0.11 टक्क्याने कमी होऊन 50,029 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. दरम्यान आज चांदीचे दर काहीसे वधारले आहे. 0.3 टक्क्यांनी चांदी महागल्याने एमसीएक्सवर 61,690 रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेड करत आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.7 टक्के अर्थात 350 रुपये प्रति तोळाने घसरले होते, तर चांदी 1.63 टक्के अर्थात 1000 रुपये प्रति किलोने कमी झाली होती. काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील नवीन दर आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर, अमेरिकेत आर्थिक प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. याठिकाणी सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी घसरले आहेत, या घसरणीनंतर भाव 1,863.21 डॉलर प्र​ति औंस झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी देखील 0.1 टक्क्याने कमी होऊन 24.06 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. (हे वाचा-ग्राहकांना SBI ने केलं सावधान! परवानगीशिवाय हे काम केल्यास केली जाईल कठोर कारवाई) दरम्यान कोव्हिड-19 संक्रमणाचा परिणाम देखील सोन्याच्या बाजारावर होताना दिसत आहे. कोरोना लशीच्या प्रगतीसंदर्भात बातम्या समोर येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशा वाढली आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इक्विटी मार्केट देखील सर्वोच्च स्तरावर आहेत. मात्र कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जोखीम देखील वाढली आहे. अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चितता कायम आहे. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्टीव्हन म्युचिन यांनी म्हटले आहे की, लॉमेकर्सवर खर्च न केलेला प्रोत्साहन निधी पुनर्निर्देशित केला गेला पाहिजे. (हे वाचा-आयकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यामध्ये पाठवले 1.36 लाख कोटी,वाचा सविस्तर) गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (Gold ETF) गुंतवणूकदारांनीही कमी रस दाखवला आहे. एसपीडीआर गोल्ड ट्रस्टमध्ये गोल्ड ईटीएफ होल्डिंग 0.14 टक्क्यांनी वाढून 1,217.25 टन झाली. हे जगातील सर्वात मोठे गोल्ड ईटीएफ आहे. विश्लेषकांच्या मते सोन्याचे भाव 1,850 डॉलर प्रति औंसवर पोहोचून देखील ते  1,900 डॉलरच्या स्तरापर्यंत नाही पोहोचले आहेत. अनेक कारणांमुळे सोन्याचे दर याच रेंजमध्ये आहेत. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या