मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rate Today: सोन्यात गुंतवणुकीची आहे योग्य वेळ! रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold Rate Today: सोन्यात गुंतवणुकीची आहे योग्य वेळ! रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold investment: सध्या रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी सोन्याचे दर स्वस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: जर तुम्ही सोनेखरेदीचा (Gold price Today) विचार करत असाल तर तुमच्याकडे आता योग्य संधी आहे. कारण सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10,000 रुपये (Gold rates Today) प्रति तोळाने कमी आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात. स्टाँग डॉलर आणि चीनचे Evergrande संकट दूर झाल्यामुळे सोन्यावर दबाव आहे.

1 वर्षात 10000 रुपयांनी कमी झाले आहेत सोन्याचे दर

एका वर्षात सोन्याच्या किंमतीवर नजर टाकली तर जवळपास 10000 रुपयांनी दर कमी झाले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा होते, तर सप्टेंबर 2021 मध्ये सोन्याचे दर 46,000रुपये प्रति तोळाच्या आसपास आहेत.

का उतरले सोन्याचे दर?

डॉलर इंडेक्स एका महिन्याच्या सर्वोच्च स्तरावर आहे, त्यामुळे देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. फेडने अपेक्षेपूर्वी सोन्याचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. Fed 2022 मध्यापर्यंत पॅकेज संपवू शकते. शिवाय लसीकरणात आलेली तेजी, इकॉनॉमीमध्ये रिकव्हरीचे संकेत, या दरम्यान चीनमधील Evergrande संकट दूर झाल्यामुळे सोन्यावर दबाव आहे.

हे वाचा-5 दिवसांनी बदलणार तुमच्या जीवनावर परिणाम करणारे नियम,चेकबुक-LPGसह यात होणार बदल

सोन्यामध्ये गुंतवणुकीची संधी

फेस्टिव्ह सीझनआधी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर गेल्या सहा आठवड्यांच्या निचांकी स्तरावर आहेत. कॉमेक्सवर सोन्याचे दर 1750 डॉलरच्या स्तरावर आहे. तर एमसीएक्सवर सोन्याचे दर (Gold Rate on MCX) 46,000 च्या लेव्हलवर ट्रेड होत आहेत. SPDR Gold ETF होल्डिंग 8.1 टन कमी झाली आहे. गुरुवारी होल्डिंग 0.8%ने कमी होऊन 992.65 टन आहे. सोन्याचा दर रेकॉर्ड हायपेक्षा 20% नी कमी झाला आहे. यामुळे आता तुम्ही सोन्यात गुंतवणूक करून भविष्यात चांगला फायदा मिळवू शकता.

First published: