• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: 5 दिवसांत 450 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज होतेय या दराने विक्री

Gold Price Today: 5 दिवसांत 450 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज होतेय या दराने विक्री

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होते आहे. अवघ्या 5 दिवसात सोन्याचे दर 450 रुपयांनी कमी झाले आहेत

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today)गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होते आहे. अवघ्या 5 दिवसात सोन्याचे दर 450 रुपयांनी कमी झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) शुक्रवारी 06 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर 0.26 टक्क्यांनी उतरले आहेत. गेल्या सोमवारी  सोन्याचे दर 0.16 टक्क्यांनी उतरुन 47926 रुपये प्रति तोळा झाले होते. 5 दिवसात 450 रुपयांनी स्वस्त झालं सोनं (Gold Price) सोमवारी सोन्याचे दर 47926 रुपये प्रति तोळा होते. तर शुक्रवारी सोन्याच्या दरात 0.26 टक्क्यांनी घसरण झाली आहे, यानंतर दर 47,480 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. अर्थात सोन्याच्या दरात गेल्या पाच दिवसात 450 रुपयांनी कमी झाले आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बंद असते. हे वाचा-RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये बदल नाही, तुमच्या कर्जावर काय होईल परिणाम? चांदीच्या दरात किती झाली घसरण? (Silver Price) गेल्या सोमवारी चांदीचे दर 0.3 टक्के दराने कमी झाले होते. यानंतर चांदीची किंमत 67865 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती. शुक्रवारी चांदीचे दर 66,720 रुपये प्रति किलो होते. अर्थात गेल्या पाच दिवसात चांदीचे दर 1100 रुपयांनी कमी झाले आहेत. भविष्यात महागणार सोनं? कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सोन्यामध्ये चढउतार जारी आहे. व्हॅक्सिनेशन प्रक्रिया जगभरात सुरू झाल्यानंतर अशाप्रकार चढउतार अधिक प्रमाणात होत आहे. अशावेळी 25 कोटी डॉलरच्या क्वाडरिगा इग्नियो फंड सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला यांचं असं म्हणणं आहे की सोन्याचे दर पुढील 3-5 वर्षात सध्यापेक्षा दुप्पट होतील. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 3000-5000 डॉलर प्रति औंसवर पोहचू शकतात. या अंदाजाने भारतात सोन्याचे दर 90,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: