Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीबाबत काहीसा दिलासा, वाचा काय आहेत लेटेस्ट दर

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीबाबत काहीसा दिलासा, वाचा काय आहेत लेटेस्ट दर

Gold Price Today: सोन्याचे दर आज घसरल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आजही (Gold Rates on 21st July) सोन्याचे दर 47 हजारांपार आहेत. चांदीच्या किंमतीही आज उतरल्या आहेत.

    नवी दिल्ली, 21 जुलै: सोन्याचांचीच्या दरात आज बाजार बंद होत असताना घसरण पाहायला मिळाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार बुधवारी 22 कॅरेट सोन्याचे दर (Gold Price Today on 21 July 2021) 47,400 रुपयांवरुन कमी होत 47,050 रुपये प्रति तोळावर आले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price) 66,600 रुपये प्रति किलो झाले आहेत. दरम्यान बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 380 रुपये प्रति तोळाने कमी होत 51,330 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 51,710 रुपये प्रति तोळा होते. चांदीचे दर आधी 67,500 रुपये प्रति किलो होते, त्यामध्ये 900 रुपयांची घसरण होत दर 66,600 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. देशातील महत्त्वाच्या शहरातील 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर मुंबई- 47,120 रुपये प्रति तोळा नवी दिल्ली- 47,050 रुपये प्रति तोळा चेन्नई- 45,300 रुपये प्रति तोळा हे वाचा-Gold Jewellery बाबतचा हा निर्णय होणार रद्द? वाचा काय आहे सरकारचं स्पष्टीकरण का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये झालेल्या या बदलामुळे भारतातील बाजारावरही याचा परिणाम झाला आहे. हे वाचा-Post Office ची ही योजना ठरेल फायद्याची, कमी गुंतवणुकीतून कसे मिळतील 16 लाख? सध्याच्या दरात खरेदी केल्यास किती मिळेल फायदा जाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात. सोन्यामधील गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्या सोनंखरेदीसाठी उत्तम वेळ आहे आणि सोनं हा एक चांगला पर्याय देखील आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या