मुंबई, 03 जून : एकीकडे कोरोना, दुसरीकडे चक्रीवादळ या सगळ्या संकटात सोन्या-चांदीचे भावही गडगडले आहेत. मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्स (MCX) ऑगस्टच्या सोन्याच्या दरानुसार आज 10 ग्रॅम सोन्याचे दर 46 हजार 470 आहेत. तर चांदीही घसरली आहे. चांदीचे प्रति किलो मागे 48 हजार 830 झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन यांच्यातील वादामुळं तसेच अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनामुळं सोन्यांच्या किंमतीत बदल झालेला दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती कमी 0.2% ने कमी झाल्या. तर प्लाटिनमच्या (platinum) दरात 0.1% वाढ झाली आहे. तर चांदीचे दर 0.6% घसरले आहेत. दरम्यान भारतात या महिन्याच्या 15 मे रोजी सोन्याच्या किंमतींनी 47,067 रुपये प्रति तोळावर पोहचून एक रेकॉर्ड रचला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट झाली. लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळाला आहे.
वाचा-सामान्यांच्या खिशाला फटका! भारतात पेट्रोल-डिझेल महाग होण्याची शक्यता, वाचा कारणलॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत झालेले चढउतार
- लॉकडाऊन 1.0 : 25 मार्च ते 14 एप्रिल या 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान एकूण 2,610 रुपये प्रति तोळाने सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या
- लॉकडाऊन 2.0 : 15 एप्रिल ते 3 मे दरम्यान असणाऱ्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सोनं एकूण 121 रुपये प्रति तोळाने वधारलं होतं.
- लॉकडाऊन 3.0 : 3 मे ते 17 मे दरम्यान लॉकडाऊनचा तिसरा टप्पा होता. या कालावधीमध्ये सोन्याचे दर 1,154 रुपये प्रति तोळाने वाढले होते. याच काळात सोन्याने 47,000 चा टप्पा पार करत नवे रेकॉर्ड रचले होते.
- लॉकडाऊन 4.0 : किंमती वाढण्याचा पॅटर्न लॉकडाऊन 4 मध्ये खंडित झाला आहे. या टप्प्यातील 3 दिवसांमध्ये सोने 47 हजारांच्या वर होते. 18 मे रोजी सोन्याच्या किंमती 47,861 रुपये, 20 मे रोजी 47,260 रुपये तर 22 मे रोजी 47,100 रुपये प्रति तोळा इतक्या होत्या. तरी देखील शेवटच्या दिवसापर्यंत सोन्याच्या किंमती 932 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत.
वाचा-600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.