Home /News /money /

विदेशी बाजारापाठोपाठ भारतातही उतरलं सोनं, वाचा काय आहे कारण

विदेशी बाजारापाठोपाठ भारतातही उतरलं सोनं, वाचा काय आहे कारण

Gold Silver Price Today 09 September 2020- जगभरातील मोठ्या देशांच्या केंद्रीय बँकांच्या बैठकीआधी अमेरिकन डॉलरमध्ये तेजी आली आहे. त्याचा परिणाम आज सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 09 सप्टेंबर : अमेरिकन डॉलरमध्ये (USD-US Dollar) आलेल्या तेजीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर (Gold Price Down) घसरले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर देखील झाला आहे. बुधवारी देशांतर्गत वायदे बाजारात सोनेचांदीच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 233 रुपयांनी कमी होऊन 51120 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. आधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 51153 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते आणि आज सकाळी देखील सोन्यात घसरण होत 51165 रुपये प्रति तोळाने किंमत सुरू झाली होती. डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये 605 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.  यामुळे चांदीची वायदा किंमत 67889 रुपये प्रति किलो इतकी होती. आधीच्या सत्रामध्ये चांदी 68494 रुपयांवर बंद झाली होती. तर आज सकाळी घसरणीनंतर 68056 रुपये किंमतीवर चांदी उघडली होती. (हे वाचा-Jio प्लॅटफॉर्मनंतर एसएलपीची रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक) देशांतर्गत बाजारात काय असेल आजची स्थिती? तज्ज्ञांच्या मते आज सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसेल. मात्र मोठी घसरणीची शक्यता नाही आहे. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 51.867 रुपये प्रति तोळावरून वाढून 51,989 रुपये प्रति तोळा झाले होते. या दरम्यान सोन्याचे दर 122 रुपयांनी वाढले होते. मंगळवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली होती. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 69,325 रुपयांवरून वाढून 69,665 रुपये प्रति किलो झाली होती. आता पुढे काय? जगभरातील सर्वात मोठी रिसर्च एजन्सी असणाऱ्या जेफरीजच्या अहवालानुसार, अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. (हे वाचा-भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत! यावर्षी GDPमध्ये 10.5 टक्के घसरण होण्याचा अंदाज) त्यांच्या मते सध्याच्या स्तरावरून डॉलरला आणखी मजबूती मिळाली तर सोन्याच्या किंमती 1900 डॉलर प्रति औंसच्या खाली येऊ शकतात. त्यामुळे सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या