घसरण होऊनही 50 हजारांच्या जवळपास आहेत सोन्याचे दर, वाचा काय आहेत मंगळवारचे भाव

घसरण होऊनही 50 हजारांच्या जवळपास आहेत सोन्याचे दर, वाचा काय आहेत मंगळवारचे भाव

मंगळवारी देशातील सराफा बाजारात सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सकाळी बाजार उघडल्यानंतर ही घसरण झाली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जुलै : मंगळवारी देशातील सराफा बाजारात सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सकाळी बाजार उघडल्यानंतर ही घसरण झाली आहे. सोन्याचे दर 77 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत, परिणामी मंगळवारी सकाळच्या सत्रात 999 शुद्धतेच्या सोन्याचे दर 49,247 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीमध्ये काहीशी वाढ पाहायला मिळाली. आज चांदीचे दर सकाळच्या सत्रात 13 रुपयांनी प्रति किलोमागे वाढले आहेत.

काय आहेत सोन्याचे नवे दर? (Gold Rates on 14th July 2020)

मंगळवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे भाव 77 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी आज या शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 49,247 रुपये आहेत. सोमवारी ही किंमत 49,324 रुपये प्रति कोळा इतकी होती. 23 कॅरेट सोन्याच्या किंमती देखील 76 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या घसरणीनंतर या शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,050 रुपये प्रति तोळा झाली आहे. त्याचप्रमाणे 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव देखील मंगळवारी सकाळच्या सत्रामध्ये कमी झाले आहेत. या शुद्धतेच्या सोन्याची किंमत अनुक्रमे 45,110 रुपये, 36,935 रुपये आणि 28,809 रुपये प्रति तोळा झाली आहे.

काय आहेत चांदीचे आजचे दर? (Silver Rates on 14th July 2020)

सोमवारी बाजार बंद होताना चांदीचे दर 51780 रुपये प्रति किलो होते. यामध्ये आज सकाळच्या सत्रात केवळ 13 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चांदीचे दर 51,793 रुपये प्रति किलो झाले आहेत.

6 महिन्यात 10 हजारांनी वाढले सोन्याचे दर

2020 या वर्षाच्या सुरुवातीस एक तोळा सोन्याचे दर 39 हजार रुपये होते जे आतापर्यंत 49,500 च्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. वायदा बाजारात सध्या सोन्याचे दर 49 हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(हे वाचा-बहिण-भावाच्या नात्यामुळे बसणार चीनला फटका, 4000 कोटींचे होणार नुकसान)

(हे वाचा-Google कडून भारतासाठी आली आनंदाची बातमी! Digital India साठी 10 अब्ज डॉलर्स)

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 14, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading