Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी आजही उतरली, वाचा किती कमी झाले दर

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी आजही उतरली, वाचा किती कमी झाले दर

Gold Rates Today: सोन्याचांदीच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळते आहे. लग्नसराईच्या काळामध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याची ही एक चांगली संधी आहे

    नवी दिल्ली, 23 मार्च: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price) सुरू असणारी घसरण अद्यापही सुरू आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याचे दर 120 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत कमजोरी पाहायला मिळते आहे. याठिकाणी दुसऱ्या दिवशी सलग सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे भाव 0.24 टक्क्यांनी कमी होऊन 44,795 रुपेय प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price) 0.6 टक्क्याने कमी होऊन 66,013 प्रति किलोग्राम झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.18 टक्के तर चांदीमध्ये 1.6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. काय आहेत सोन्याचे भाव? (Gold Rates on 23rd March 2021) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत 43,800 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 44,795 रुपये प्रति तोळा आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 302 रुपये प्रति तोळाने कमी झाले होते. काय आहेत चांदीचे नवे भाव? (Silver Rates on 23rd March 2021) मंगळवारी चांदीच्या किंमतीत देखील किरकोळ घट झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 66,013 रुपये प्रति किलोवर आले आहेत. सोमवारी चांदीचे दर 1.6 टक्क्यांनी कमी झाले होते. (हे वाचा-एप्रिलमध्ये 17 दिवस सुरू असणार बँका, मार्चचा शेवटचा आठवडाही सुट्ट्यांचा) आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचांदीचे दर स्पॉट गोल्डची किंमत 0.3% ने कमी होऊन दर 1,733.69 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर 0.6% ने कमी होऊन 25.61 डॉलर आणि प्लॅटिनमची किंमत 0.3% ने घसरून 1,179.59 डॉलर झाले आहेत. आतापर्यंत 11500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं यावर्षी गेल्या काही महिन्यांत सोनं 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीने स्वस्त झालं आहे. कोरोना संकटात सोन्याचे दर 55 हजार रुपयांच्या पार होते. ऑगस्टमध्ये दर 56,200 रुपये प्रति तोळा झाले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून सोन्याच्या किंमती सतत खाली आल्या आहेत. लसीकरणानंतर आर्थिक क्रियेत वेग वाढण्याची अपेक्षा आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Investment, Money, Silver prices today

    पुढील बातम्या