Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ, चांदीही 1448 रुपयांनी महागली

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ, चांदीही 1448 रुपयांनी महागली

Gold-Silver Update: बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आलेल्या तेजीमुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: मंगळवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे (Gold Price Today) दर वाढले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे. आज सोन्याबरोबर चांदीचे भाव देखील वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते फेस्टीव्ह सीझनमुळे देशातील सोन्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेत निवडणुकीआधी आर्थिक पॅकेजसंदर्भात निर्माण झालेल्या आशा आणि अमेरिका-चीन मधील तणावाचा परिणाम देखील सोन्याच्या दरावर होऊ शकतो. सोन्याचे आजचे दर (Gold Price on 21st October 2020) राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति तोळा 512 रुपयांनी वाढून 51,415 रुपये झाले आहेत. मंगळवारी सोन्याच्या दराचे ट्रेडिंग 50,903 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 1,921 डॉलर प्रति औंस झाले आहेत. (हे वाचा-फसवणुकीपासून वाचण्यासाठी टाळा या चुका, SBI चा ग्राहकांना इशारा) चांदीचे आजचे दर (Silver Price on 21st October 2020) सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली. चांदी आज 1448 रुपयांनी महागली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति  किलो 54,015 रुपये झाले आहेत. याआधी चांदीचे ट्रेडिंग 52,567 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 2510 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. अमेरिकन डॉलर आणि रुपयामुळे सोन्याच्या किंमतीवर काय परिणाम होतो? डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमी-जास्त होणाऱ्या मुल्याचा भारतातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतीवर याचा परिणाम होत नाही. साधारणपणे सोन्याची आयात केली जाते. (हे वाचा-मोदी सरकारचं खास गिफ्ट!दसऱ्याआधीच 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस) त्यामुळे अमेरिकन चलनाच्या तुलनेत जर भारतीय रुपया कमजोर झाला तर सोन्याचे दर भारतीय चलनामध्ये वाढतात. अशाप्रकारेच रुपयाचे मुल्य घसरल्याने सोन्याची मागणी कमी होते. सामान्य परिस्थितीत जेव्हा डॉलर कमजोर होतो, तेव्हा सोन्याचे दर वाढतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव डॉलरमध्ये निश्चित केले जातात. परिणामी डॉलरमध्ये कमजोरी आल्यानंतर सोन्याचे भाव वाढतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today, Money

    पुढील बातम्या