सोन्याच्या दराने आज पुन्हा एकदा तोडलं रेकॉर्ड, हे आहेत आजचे दर

सोन्याच्या दराने आज पुन्हा एकदा तोडलं रेकॉर्ड, हे आहेत आजचे दर

सणासुदीच्या दिवसांमध्ये दागिन्यांची विक्री वाढणार आहे. त्याचबरोबर आर्थिक मंदीच्या काळात लोक सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित मानत आहेत. त्यामुळेच सोन्याचे भाव वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढ होतेय. सराफा बाजारात सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ होऊन आता सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 39 हजार 970 रुपये झाला आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणात स्थानिक दागिनेविक्रेत्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोनं महाग होतं आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीतही वाढ होतेय. चांदीचे भाव 48 हजार रुपये प्रतिकिलो झाले आहेत. ही वाढ तब्बल 2 हजार 110 रुपयांची आहे.

का महागलं सोनं ?

सणासुदीच्या दिवसांमध्ये दागिन्यांची विक्री वाढणार आहे. त्याचबरोबर आर्थिक मंदीच्या काळात लोक सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित मानत आहेत. त्यामुळेच सोन्याचे भाव वाढले आहेत.

यावर्षी जागतिक बाजारातली स्थिती पाहता सोन्याचे दर 40 हजारांवर जातील, असा तज्ज्ञांचाही अंदाज होता.

SBI ATM चे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

=====================================================================================

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रथावर पोहोचले काँग्रेसचे बंडखोर नेते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 07:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading