सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ पण चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर

सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ पण चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे पण चांदी मात्र स्वस्त झाली आहे. काय आहेत यामागची कारणं यासाठी वाचा ही बातमी.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : सोन्याच्या किंमतीत गेले काही दिवस घट झाली होती पण आता मात्र वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, सोन्याचा दर प्रतितोळा 38 हजार 770 रुपये झाला आहे. देशात सोनं महागड्या किंमतीत विकलं जातं आहे पण चांदी मात्र स्वस्त झाली आहे.

चांदीच्या किंमतीत घट

चांदीच्या किंमतीत चांगलीच घट झाली असून चांदीचा दर प्रतिकिलो 43 हजार 900 रुपये झाला आहे. चांदीच्या नाण्यांच्या किंमतीतही घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या किंमती घटल्या आहेत.अमेरिकी डॉलरची किंमत वाढल्यामुळे सोनं स्वस्त झालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती 1500 डॉलर प्रतिऔंस वर आल्या आहेत. चांदीच्या किंमतीत घट होऊन हे दर 16. 93 डॉलर प्रतिऔंस झाले आहेत.

SBI डेबिट कार्ड रद्द करण्याच्या तयारीत, असे काढता येणार पैसे

रक्षाबंधनच्या दिवशी सोन्याचांदीचे दर कमी झाल्यामुळे खूशखबर मिळाली होती. आता मात्र पुन्हा एकदा सोन्याचे दर रेकॉर्डब्रेक वाढले आहेत.गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपतीच्या सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे.त्याचबरोबर नवरात्रही जवळ आलं आहे. आता या सणासुदीच्या दिवसांत सगळ्यांचंच सोन्याचांदीच्या दरांवर लक्ष आहे.

1 लाख रुपयांत सुरू करा हा बिझनेस, दरमहा मिळवा हजारो रुपये

=====================================================================================================

प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांना दिले जशास तसे उत्तर, पाहा हा VIDEO

Tags: goldsilver
First Published: Aug 20, 2019 05:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading