Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर सोन्याच्या किंमती, पहिल्यांदा गाठला 50 हजाराचा आकडा

Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर सोन्याच्या किंमती, पहिल्यांदा गाठला 50 हजाराचा आकडा

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सोन्याच्या किंमती रोज नवे रेकॉर्ड रचत आहेत. देशामध्ये सोन्याचे भाव पहिल्यांदा 50 हजारांच्या वर गेले आहेत

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सोन्याच्या किंमती रोज नवे रेकॉर्ड रचत आहेत. देशामध्ये सोन्याचे भाव पहिल्यांदा 50 हजारांच्या वर गेले आहेत. जगभरात सोन्याची वाढलेली मागणी आणि रुपया घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये ही वाढ झाली आहे. मुंबई रिटेल मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किंमतीत ही वाढ पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 50,050 रुपये प्रति तोळा झाले आहेत तर मुंबईमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 50,120 रुपयांवर पोहोचले आहेत. याआधी बुधवारी देखील सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होऊन नवे रेकॉर्ड रचले होते.

देशामध्ये विविध राज्यांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये फरक आढळून येतो कारण या किंमती एक्साइज ड्यूट, स्टेट टॅक्स आणि मेकिंग चार्जेस नुसार ठरवल्या जातात. परिणामी प्रत्येक राज्यात काहीशा फरकाने वेगवेगळ्या किंमती असू शकतात. मात्र आज देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याने 50 हजारांचा दर पार केला आहे.

(हे वाचा-बापरे! 1 तोळं सोनं 1 लाखांपार; या देशात सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1,788 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहेत. तर चांदीचे भाव 18.35 डॉलर प्रति औंस आहेत. अमेरिकेत देखील सोन्याचे भाव 8 वर्षातील उच्चतम स्तरावर आहेत. शेअर मार्केटमध्ये होणारी घसरण, लॉकडाऊनमुळे विविध व्यवसायामध्ये सुरू असणारी कमजोर स्थिती त्याचप्रमाणे जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याजदर घटवल्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. या सर्व सकंटाच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गंतवणूक म्हणून पाहिले जाते. भविष्यात सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

(हे वाचा-नोकरी जाण्याची भीती असल्यास सुरू करा हा व्यवसाय, करू शकता लाखोंची कमाई)

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 2, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading