Home /News /money /

Gold Rates Today: सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनंचांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर?

Gold Rates Today: सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनंचांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर?

सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आज देखील घसरण पाहायला मिळाली आहे. MCX (Multi commodity exchange) वर सोन्याची वायदे किंमत 0.3 टक्के म्हणजेच 127 रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 44,732 प्रति तोळावर ट्रेड करत आहेत.

    नवी दिल्ली, 10 मार्च: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आज (Gold Price Today)  देखील घसरण पाहायला मिळाली आहे.  MCX (Multi commodity exchange) वर सोन्याची वायदे किंमत 0.3 टक्के म्हणजेच 127 रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 44,732 प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. तर एमसीएक्सवर चांदीचे दर देखील 0.7 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे भाव कमी होऊन 67,011 प्रति किलोवर ट्रेड करत आहेत. ऑगस्टमध्ये सोनं रेकॉर्ड हाय स्तरावर होतं. त्यानंतर आतापर्यंत सोन्यामध्ये साधारण 11500 रुपयांची घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. सोन्याचे दर सध्या 11 महिन्यातील निचांकी स्तरावर आले आहेत. सोन्याने गेल्यावर्षी जवळपास 57,000 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र आता सोन्याचे भाव 22 टक्क्यांनी उतरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील एका मोठ्या उसळीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. (हे वाचा-हरयाणातील भाजपा सरकार वाचणार की जाणार? मुख्यमंत्री खट्टर यांच्या टेन्शनमध्ये वाढ) फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसीवर व्यापाऱ्यांची नजर सोन्याचे व्यापारी पुढील आठवड्यातील फेडरल रिझर्व्हच्या दोन दिवसीय धोरणावर लक्ष केंद्रित करीत आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेची आर्थिक धोरण बैठक असून अध्यक्ष क्रिस्टीन लेगार्ड हे गुरुवारी संक्षिप्त माहिती देणार आहेत. याव्यतिरिक्त, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या $ 1.9 ट्रिलियन डॉलरच्या कोरोनोव्हायरस मदत पॅकेजवरही बाजाराचे लक्ष आहे. गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे? आयसीआयसीआई प्रूडेंशियल AMC चे प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड स्ट्रॅटेजी हेड, चिंतन हरिया असे म्हणतात की, गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी आहे. गेल्यावर्षी रिटर्न जवळपास 25 टक्के होता. जर तुम्ही लाँग टर्मचा विचार करून गुंतवणूक करणार असाल तर सध्या सोनं हा एक सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. ज्यात चांगला रिटर्न मिळत आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही गुंतवणुकीसाठी काही दिवस थांबू शकणार असाल तर सोन्याचे दर 40 हजारांपेक्षा देखील कमी होऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या