Home /News /money /

Gold Price Today: नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठे बदल, हे आहेत आजचे दर

Gold Price Today: नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठे बदल, हे आहेत आजचे दर

2020 या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठे बदल झालेत. सोन्याच्या किंमतींमध्ये थोडी वाढ झालीय. सोन्याप्रमाणेच चांदीही महाग झालीय.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : 2020 या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठे बदल झालेत. सोन्याच्या किंमतींमध्ये थोडी वाढ झालीय. सोन्याप्रमाणेच चांदीही महाग झालीय. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुपया कमकुवत झाल्यामुळे गुरुवारी सोनं-चांदीच्या किंमती वाढल्या. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 39,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 1,520 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.85 डॉलर प्रति औंस झालीय. चांदीचा भाव 47 हजार 781 रुपये प्रतिकिलो झाला. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2019 हे वर्ष चांगलं होतं. तज्ज्ञांच्या मते, जगभरातल्या आर्थिक मंदीमुळे सोनं 45 हजार रुपये प्रतितोळा होऊ शकतं. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव सोन्याची खरेदी करताना सराफावर अंधपणे विश्वास ठेवून चालत नाही. सोन्याची मूळ किंमत, घडणावळीचे दर अशा घटकांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होतो. सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी पूर्ण देशात एकच निकष नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. (हेही वाचा : विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन आहे का? तिकीट बुक करण्याआधी वाचा ही बातमी) पक्कं बिल घ्या सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत. शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा. (हेही वाचा : नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता) ===========================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Gold, Money

    पुढील बातम्या