Home /News /money /

Gold Silver Rates: 1277 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याचीही झळाळी उतरली; वाचा नवे दर

Gold Silver Rates: 1277 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याचीही झळाळी उतरली; वाचा नवे दर

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोने खरेदी स्वस्त झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्या आहेत.

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Rates Today) पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याचे दर 121 रुपयांनी उतरले आहेत तर चांदीमध्ये (Silver Rates Today) प्रतिकिलो 1277 रुपयांची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी बाजारात सोन्याचे भाव एका महिन्यातील सर्वात खालच्या स्तरावर आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे चिंता वाढली आहे. यामुळेच बुधवारी डॉलरचे मुल्य एका महिन्यातील सर्वोच्च स्तरावर होते. यामुळेच सोन्याचे दर कमी होत आहे. पुढील आठवड्यात देखील सोन्याच्या किंमतीवर दबाव राहण्याची शक्यता जास्त आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price, 29 October 2020) गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 121 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. परिणामी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे नवे भाव 50,630 रुपये प्रति तोळा आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 50,751 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1878 डॉलर प्रति औंस आहेत. यानुसार सोन्यामध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. यूएस गोल्ड फ्यूचर्समध्ये कोणताही बदल न होता किंमत 1,879.60 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचे नवे दर  (Silver Price, 29 October 2020) सोन्याबरोबरच चांदीचे दर देखील आज कमी झाले आहेत. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 1277 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदी  60,098 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 0.1 टक्क्याने वाढून 23.43 डॉलर प्रति औंस होते. दिवाळीमध्ये मिळेल चांगल्या कमाईची संधी ज्या ग्राहकांनी सॉव्हरेन गोल्ड बाँड्समध्ये (SGB - Sovereign Gold Bonds) सर्वात आधी गुंतवणूक केली होती, त्याना दुप्पट कमाईची संधी आहे. 2015 मध्ये सॉव्हरेन बाँड लाँच झाले होते. यावेळी लाँच झालेल्या बाँडचा प्रीमॅच्यूअर रिडम्प्शनचा कालावधी 2020 नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्यावेळी गोल्ड बाँडची किंमत 2683 रुपये प्रति ग्रॅम होती.  इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA - Indian Bullion & Jewellers Association) च्या मते आता सोन्याचे दर 5,135 रुपये प्रति ग्रॅम आहेत. (हे वाचा-Loan Moratorium: व्याजावरील व्याज माफ योजनेसाठी तुम्हाला करावा लागेल अर्ज?) पण सर्वात पहिल्या गोल्ड बाँडना 5 वर्ष आता पूर्ण होत आहेत, अशावेळी फिजिकल फॉर्म किंवा ऑनलाइन गोल्ड खरेदी करणारे गुंतवणूकदार हे REDEEM करू शकतात. हे बाँड रीडिम केल्यानंतर सोन्याचे भाव IBJAने जारी केलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारावर असेल. सध्याच्या किंमती लक्षात घेता, ज्यांनी 5 वर्षांपूर्वी यामध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 90 टक्के फायदा मिळेल. त्याचप्रमाणे या गुंतवणुकदारांना गेल्या 5 वर्षात प्रति वर्षी 14 टक्के नफा झाला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या