लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी उतरले सोन्याचे दर, जाणून घ्या सोमवारचे भाव

लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी उतरले सोन्याचे दर, जाणून घ्या सोमवारचे भाव

कोरोना व्हायरसमुळे देशातील सराफा बाजार बंद आहेत. सामान्य नागरिकांकडून सोन्याचांदीची खरेदी होत नसली तरीही सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार सुरूच आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशातील सराफा बाजार बंद आहेत. सामान्य नागरिकांकडून सोन्याचांदीची खरेदी होत नसली तरीही सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार सुरूच आहे. आज सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.  बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी सकाळी बुलियन मार्केटमध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 201 रुपयांनी कमी होत 46,606 रुपयांवर आली होती. दुपारी सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी घसरण झाली. त्यानंतर दिवसाच्या शेवटी गोल्ड 999 च्या किमतीमध्ये 271 रुपयांची घसरण झाली आहे.

(हे वाचा-लॉकडाऊन जरी संपला तरी मे महिन्यात 13 दिवस बँका बंद, त्यानुसार करा कामाचं नियोजन)

सकाळच्या सत्रामध्ये चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली मात्र त्यांनतर चांदी प्रति किलो 20 रुपयांनी वधारली आहे. त्यमुळे चांदी प्रति किलो 42050 वर पोहोचली आहे.

वायदे बाजारात काय आहेत सोन्याची किंमत?

सोन्याच्या वायदे बाजारात 0.24 टक्के घसरण होऊन सोन्याची किंमत प्रति तोळा 46,415 रुपयांवर येऊन पोहोचली आहे. सोन्याची स्पॉट मागणी कमी झाल्यामुळे एमसीएक्सवर जूनची वायदा किंमत 112 रुपयांनी घसरून प्रति तोळा 46,415 रुपये आहे. तर ऑगस्टच्या वायदा किंमतीतही 131 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

(हे वाचा-ATM मधून पसरू शकतो कोरोना, पैसे काढताना घ्या ही काळजी)

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमती 0.12 टक्क्यांनी वाढून 1,737.70 डॉलर प्रति औंस झाल्या आहेत

वायदे बाजारात काय आहेत चांदीची किंमत?

स्पॉट मागणी वाढल्यामुळे चांदीची वायदा किंमत 0.42 टक्क्यांनी वाढून 42,227 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. एमसीएक्सवर मे महिन्यासाठी चांदीची किंमत 176 रुपयांनी वाढून 42,227 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे.

(हे वाचा- संकटकाळात भारतीय डिजिटल उद्योगात झालेली FACEBOOK- JIO गुंतवणूक मोठी)

संपादन जान्हवी भाटकर

First published: April 27, 2020, 8:00 PM IST

ताज्या बातम्या