विक्रमी वाढीनंतर सोनं उतरलं; मंगळवारचे सोन्या-चांदीचे दर इथे पाहा
विक्रमी वाढीनंतर सोनं उतरलं; मंगळवारचे सोन्या-चांदीचे दर इथे पाहा
सोमवारी दराची ऐतिहासिक उंची गाठल्यावर सोन्याचा भाव (Gold-rate Today) दहा ग्रॅममागे 420 रुपयांनी उतरला. सोन्या-चांदीच्या दरांमध्ये (Gold-Silver Prices Today) घट होण्याचं कारण भारतीय रुपयाचं मूल्य वाढलं, हे आहे.
नवी दिल्ली, 7 जानेवारी : सोमवारी दराची ऐतिहासिक उंची गाठल्यावर सोन्याचा भाव (Gold-rate Today) दहा ग्रॅममागे 420 रुपयांनी उतरला. सोन्या-चांदीच्या दरांमध्ये (Gold-Silver Prices Today) घट होण्याचं कारण भारतीय रुपयाचं मूल्य वाढलं, हे आहे. सोन्याबरोबर चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली. चांदीचा किलोचा दर सोमवारच्या तुलनेत 830 रुपयांनी कमी झाला.
अमेरिका आणि इराणच्या दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाल्याने देशभरात सोन्याने दराचा उच्चांक गाठला होता. मंगळवारी मात्र भारतीय रुपयाचं मूल्य वाढलं. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली.
दिल्लीच्या सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत 420 रुपयांनी घट झाली. दहा ग्रॅमचा भाव 41,630 रुपयांवरून उतरून 41,210 रुपये झाला. सोमवारी सोन्याचा दर जवळपास दीड हजारांनी वाढला होता.
चांदीचे दरही सोमवारी प्रचंड वाढले होते. चांदीचे दरही 49,430 रुपयांवरून उतरून 48,600 रुपये प्रति किलोवर आले आहेत. हे दिल्लीतले दर आहेत.
का वाढले होते दर?
अमेरिकेने इराणचे लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांच्यावर हल्ला करून हत्या केल्यानंतर युद्धाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला. त्याचे पडसाद सोन्याच्या किमतीवरही होत आहे. यावर्षीची आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ सोमवारी झाली.
-----------------------------------------------------
अन्य बातम्याघरात ठेवलेल्या सोन्यावर आहे बँकांची नजर, मोदी सरकारचे नवे आदेशकचऱ्यात टाकलेल्या लॉटरी तिकिटांनी बदललं नशीब, रात्रीत करोडपती झाला भाजी विक्रेताGoogle Pay, Paytm वरून पेमेंट करताना काळजी घ्या, होऊ शकते फसवणूक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.