सोन्याचे दर उतरले; मंगळवारचे दर इथे पाहा

सोन्याचे दर उतरले; मंगळवारचे दर इथे पाहा

गेले काही दिवस सातत्याने वाढणारे सोन्याचे भाव मंगळवारी बऱ्यापैकी उतरले. सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold-Silver Prices Today) घट होण्यामागे रुपयाचं वाढलेलं मूल्य आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी : गेले काही दिवस सातत्याने वाढणारे सोन्याचे भाव मंगळवारी बऱ्यापैकी उतरले. सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold-Silver Prices Today) घट होण्यामागे देशाच्या चलनमूल्यांकनाचा संबंध आहे. रुपयाचं मूल्य वधारल्यानं सोन्या- चांदीच्या दरात घट झाली आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं. 10 ग्रॅम सोन्याच्या दरात (Gold Prices) 162 रुपयांनी घट झाली तर एक किलो चांदीचा दर (Silver Prices) 657 रुपयांनी उतरला.

दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर मंगळवारी 41,456 रुपयांनवरून उतरून 41,294 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये  सोन्याची किंमत 1,579 डॉलर प्रति औंस होती. तर चांदीचा दर 18 डॉलर प्रति औंस होता.

चांदीचे दरसुद्धा किलोमागे 162 रुपयांनी कमी झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य मंगळवारी वाढलं. रुपयाच्या किमतीत 11 पैशांनी वाढ झाल्याने सोन्याचे दर उतरले.

HDFC सिक्युरिटीजचे तज्ज्ञ तपन पटेल यांच्या मते, भारतीय रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचवेळी कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींवर दबाव आहे.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही ज्या किंमतीला सोनं खरेदी करता त्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. शहरांमधल्या सराफ संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याआधी सोन्याचे भाव ठरवतात.हे ठरवताना व्हॅट, लेव्ही तसंच उत्पादनासाठी येणारा खर्च हे सगळं विचारात घेतलं जातं. त्या शहरात ठरलेल्या भावानेच दिवसभर सोनं विकलं जातं.या कारणामुळेच वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेच्या आधारावर ठरते. 22 कॅरट आणि 24 कॅरटच्या सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

--

इतर अर्थवृत्त

बजेट 2020 : मोदी सरकारने PF वरचे व्याजदर केले जाहीर, तुमची होणार बचत

ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार्जेस वाढल्यामुळे खाणं झालं महाग

JOB करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, चुकूनही लपवली ही माहिती तर थेट कापणार पगार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 06:58 PM IST

ताज्या बातम्या