Home /News /money /

Gold price Today: काय आहे सोने-चांदी दर, तपासा मुंबईतील आजचा 22 कॅरेट भाव

Gold price Today: काय आहे सोने-चांदी दर, तपासा मुंबईतील आजचा 22 कॅरेट भाव

मुंबईत आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,900 रुपये इतका आहे. आज दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा आजचा भाव 49,830 रुपये आहे.

  नवी दिल्ली, 26 जानेवारी : सोने दरात (Gold price today) आज वाढ झाली आहे. मुंबईत आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,900 रुपये इतका आहे. आज दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा आजचा भाव 49,830 रुपये आहे. मुंबईत आजचा चांदीचा भाव (Silver price today) 64,200 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. कोरोनाचा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात (एप्रिल ते डिसेंबर 2021) दुपटीपेक्षा अधिक होऊन 38 अब्ज डॉलरवर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.

  हे वाचा - रेशन कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी नो टेन्शन, सोप्या पद्धतीने असं बनवा

  24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price) -
  शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई49830 रुपये49680 रुपये
  पुणे49910 रुपये49900 रुपये
  नाशिक49910 रुपये49900 रुपये
  नागपूर49830 रुपये49680 रुपये
  22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price ) -
  शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई45900 रुपये45750 रुपये
  पुणे45760 रुपये45750 रुपये
  नाशिक45760 रुपये45750 रुपये
  नागपूर45900 रुपये45750 रुपये
  चांदीचा दर (Silver Price) -
  शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
  मुंबई64,200 रुपये64100 रुपये
  पुणे64,200 रुपये64100 रुपये
  नाशिक64,200 रुपये64100 रुपये
  नागपूर64,200 रुपये64100 रुपये
  कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

  हे वाचा - शेअर बाजारातील घसरणीत नुकसान टाळायचंय? असा तयार करा पोर्टफोलियो नुकसान टळेल

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

  पुढील बातम्या