Home /News /money /

Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झाले बदल; सणासुदीच्या हंगामात जाणून घ्या ताजे दर

Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झाले बदल; सणासुदीच्या हंगामात जाणून घ्या ताजे दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर (Gold silver latest rate) वधारले आहेत. काय आहेत आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव?

    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात (Gold - Silver Update) चढ-उतार दिसला. दिल्लीच्या सराफा बाजारात नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव 182 रुपयांनी चढले. पण बाजार बंद होण्याच्या वेळी सोनं थोडं उतरलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाला तेजी मिळाल्याने स्थानिक बाजारपेठेतही त्याचे परिणाम दिसले. त्यातच सणासुदीचा हंगाम असल्याने सोने-चांदी बाजार चढ्या दराचाच राहिला. सोमवारचे ताजे दर खाली पाहा Coronavirus च्या साथीच्या पार्श्वभूमीवर जगभराची अर्थव्यवस्था कोलमडत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूचे दरही वाढत आहेत. HDFC सिक्युरेटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,"पुढचे काही दिवस सोन्याच्या दरात जगभरात वाढ होताना दिसेल. याचे परिणाम स्थानिक सराफा बाजारपेठेतही दिसतात. चांदीच्या दरातही सोमवारी वाढ झाली." सोन्याचा दर सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅमला 51558 रुपयांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1909 डॉलर प्रति औन्स एवढ्यावर पोहोचला.सोन्याबरोबर चांदीचे दरही वाढले. एक किलो चांदीचा दर 63,714 रुपये होता. गेल्या आठवड्यापेक्षा चांदीचा भाव किलोमागे 805 रुपयांनी वाढला. 62,909 रुपये प्रतिकिलो या दरावर शुक्रवारी चांदी स्थिरावली होती. पण आज आठवड्याच्या सुरुवातीलाच चांदीला तेजी आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा दर 24.64 डॉलर प्रति औन्स एवडा पोहोचला. कोरोनाचा सोन्या-चांदीच्या भावाशी काय आहे संबंध? Coroanvirus चा प्रादुर्भाव वाढला तसा लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले. अर्थकारण थंडावलं. याचा थेट परिणाम आता अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडू लागली आहे. अस्थिर अर्थव्यवस्थेत चलनाचे दर कमी होतात आणि मग अशा वेळी मौल्यवान धातूंचे दर वाढू लागतात. नेमकी तीच गोष्ट आता होते आहे. सोमवारी अमेरिकन डॉलरचं मूल्यही थोडं ढासळलं. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर झाला आणि सोन्याचे भाव चढले. स्थानिक बाजारपेठेतही त्याचाच परिणाम म्हणून दर चढले. पण आधीच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतात मागणी वाढली असल्याने सोन्याचे दर वाढले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दराचा जास्त परिणाम लगेच जाणवला नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या