Home /News /money /

विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचे भाव उतरले; इथे पाहा आजचे दर

विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचे भाव उतरले; इथे पाहा आजचे दर

सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) गेले काही दिवस सातत्याने वाढ होत होती. विक्रमी उच्चांकापर्यंत सोन्याचा भाव (Gold rate) गेल्यानंतर सोमवारी थोडे दर उतरले आहेत.

    नवी दिल्ली, 29 जून : सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) गेले काही दिवस सातत्याने वाढ होत होती. विक्रमी उच्चांकापर्यंत सोन्याचा भाव (Gold rate) गेल्यानंतर सोमवारी थोडे दर उतरले आहेत. चांदीमध्येही घट झालेली दिसते. आठवड्याच्या सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे सोन्याच्या गगनाला भिडत चाललेल्या किमती थोड्या कमी झाल्या. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बाजारातही फार मोठी उलाढाल न झाल्याने सोन्याचे दर दिल्लीच्या सराफा बाजारात कमी झालेले दिसले. सोन्याचा ताजा दर दिल्लीच्या बाजारपेठेत(Gold Price on 29th June 2020)49,245 रुपयांवर आला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर एकदम वाढून 10 ग्रॅमला 49,271 रुपये एवढा झाला होता. आता हाच ट्रेंड सुरू राहिला तर सोनं 50 हजार उलटून पुढे जाणार असं वाटत असताना सोमवारी मात्र सोन्याच्या दराला थोडी स्थिरला मिळाली. शुक्रवारच्या तुलनेत 26 रुपये प्रति 10 ग्राम दर कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचे दर स्थिर राहिले. सोन्याचा नवा दर 1,769.67 डॉलर प्रति औन्स होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 7.81 डॉलर प्रति औन्स एवढा राहिला. महाराष्ट्रभर लॉकडाऊन, मात्र या 11 जिल्ह्यांमध्ये होणार सर्वात कडक अंमलबजावणी सोमवारी चांदीचा भाव 49,461 रुपये प्रति किलोग्राम राहिला. शुक्रवारच्या दरात किरकोळ घट होऊन चांदीचे दर स्थानिक बाजारपेठेत स्थिर राहिले आहेत.चांदीच्या दरानेही गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला होता.
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या