जागतिक बाजारपेठेतल्या चढ-उताराने सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले; पाहा ताजा भाव

जागतिक बाजारपेठेतल्या चढ-उताराने सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले; पाहा ताजा भाव

सोन्या-चांदीचे दर (Latest gold and silver price) जागतिक स्तरावर वाढल्याचा परिणाम स्थानिक बाजारातही दिसून आला. पाहा आजचे सोन्याचा भाव.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर  :  जागतिक स्तरावर Coronavirus चं संकट कमी होण्याऐवजी आणखी गंभीर होत आहे आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरामध्ये  (Gold-Silver Price) पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही त्याचे पडसाद सोमवारी उमटले.

सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वधारला. अर्थात ही वाढ भरीव नव्हती. अगदी थोड्या प्रमाणात सोन्याच्या दराने उचल खाल्ली. चांदीचे दर मात्र थोडे उतरले आहेत. बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही काळात सोन्याच्या दरात अल्पकालीन घट होण्याची शक्यता आहे.

सोन्याचे ताजे दर (Gold Price, 23 November 2020) - ​राजधानी दिल्लीत आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57 रुपयांनी वाढून 49,767 रुपये झाला. शुक्रवार बाजार बंद होताना या मौल्यवान धातूचा दर 49,710 रुपये तोळा एवढा होता. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर आज 1,874 डॉलर प्रति औन्स एवढा होता.

चांदीची ताजी किंमत (Silver Price, 23 November 2020) - HDFC सिक्युरिटीज द्वारे दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 185 रुपयांनी कमी होऊन 61,351 रुपये प्रति किलो एवढा झाला. याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना चांदीचा दर 61,536 रुपये किले एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 24.22 डॉलर प्र​ति औन्स एवढा होता.

कोरोना लस आली तर...

एस्कॉर्ट सिक्युरिटीजचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी News18 ला दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात Coronavirus मुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना लशीसंदर्भात (Corona vaccine) काही चांगल्या बातम्या आल्या. त्यामुळे सोन्याचा चढलेला भाव खाली उतरला आहे. नव्या वर्षात कोरोना लस आली, तर हे दर आणखी खाली येतील. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही दिसेल. तसं झालं तर सोन्याचा दर 45 हजारांवर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात असेच चढ-उतार होऊ शकतात.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 23, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या