मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Dhanteras : दिवाळीच्या पहिल्याच मुहूर्तावर महागलं सोनं; चांदीच्या दरातही वाढ! पाहा ताजे दर

Dhanteras : दिवाळीच्या पहिल्याच मुहूर्तावर महागलं सोनं; चांदीच्या दरातही वाढ! पाहा ताजे दर

Gold-Silver Rate: धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशीच सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. पुढले काही दिवस सोन्याच्या दरात चढ-उतार होणार का? काय म्हणतात तज्ज्ञ? वाचा आणि पाहा ताजे सोन्याचे भाव...

Gold-Silver Rate: धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशीच सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. पुढले काही दिवस सोन्याच्या दरात चढ-उतार होणार का? काय म्हणतात तज्ज्ञ? वाचा आणि पाहा ताजे सोन्याचे भाव...

Gold-Silver Rate: धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशीच सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. पुढले काही दिवस सोन्याच्या दरात चढ-उतार होणार का? काय म्हणतात तज्ज्ञ? वाचा आणि पाहा ताजे सोन्याचे भाव...

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर (धनतेरस  dhanteras 2020) सोन्या चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक बाजारांमध्ये याच दिवशी सोन्याला मागणी वाढल्याने मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. दिवाळीच्या दिवसात लोक सोनं -चांदीचे दागिने खरेदी करतात. त्यातून आता लग्नसराईचे दिवसही जवळ आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. याच कारणामुळे शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, जाणकारांच्या मते पुढच्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाही.

दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये धनत्रयोदिशेच्या दिवशीच सोन्याच्या दरात वाढ झाली.  सोन्याची नवी किंमत (Gold Price, 13 November 2020) या बाजारात 241 रुपये प्रति तोळ्याने जास्त झाली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 10 ग्रॅमला  50,425 रुपये वर पोहोचला आहे. यापूर्वीचा गुरुवारचा दर 50,184 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,880 डॉलर प्रति औन्स एवढा राहिला.

वाळीत जर तुम्ही सोनं (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या शुद्धतेबद्दल माहित असणं आवश्यक आहे. कारण बर्‍याच वेळा ग्राहक सोन्याची शुद्धता ओळखत नाहीत, यामुळे त्यांचे नुकसान होते. सोनं खरेदी करण्याआधी तुम्हाला 14 कॅरेट ते 24 कॅरेटपासून सोन्याची किंमत माहित असावी. आज आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BSI ) मते सोन्याची शुद्धता तपासण्याचे चार प्रमुख मार्ग आहेत.

BSI करते हॉलमार्क

BSI हॉलमार्क ही देशातील एकमेव एजन्सी आहे जी सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंग करते. भारत सरकारच्या वतीने सोन्याची शुद्धता तपासण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जाते. आजच्या काळात सर्व ज्वेलर्स हॉलमार्क केलेले दागिने विकत नाहीत. काहीजण स्वत: हॉलमार्किंग करतात, म्हणून खरेदी करण्यापूर्वी आपण खरेदी केलेल्या दागिन्यांमध्ये बीआयएस हॉलमार्क केलेला आहे की नाही ते पहा.

दिवाळीत सोनं-चांदी खरेदी करताय? मग असं ओळखा तुमचं सोनं शुद्ध आहे का

सोनं खरेदी करण्याआधी जाणून घ्या दर

सोनं खरेदी करण्याआधी तुम्हाला दर माहित असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट वर भेट देऊन सध्याचे चालु दर शोधू शकता. या वेबसाइटवर दिलेल्या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नसतात.

सोनं खरेदी केल्यानंतर बिल नक्की घ्या

तसेच तुम्ही दागदागिने खरेदी करणार असाल तर नक्कीच बिल मागून घ्या. या बिलमध्ये सोन्याची शुद्धता आणि दर इत्यादींची माहिती ठेवली आहे. आपल्याकडे बिल नसल्यास आपण सोन्याची विक्री करू शकत नाही

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today