मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्याचे दर पुन्हा वाढले! पण तज्ज्ञ सांगतात काही दिवसांत होणार इतके कमी; जाणून घ्या कारण

सोन्याचे दर पुन्हा वाढले! पण तज्ज्ञ सांगतात काही दिवसांत होणार इतके कमी; जाणून घ्या कारण

सराफा बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरांची तेजी फार काळ टिकणार नाही. काही दिवसात सोन्याचा भाव कोसळणार आहे. कधी आणि काय आहे कारण? वाचा सविस्तर

सराफा बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरांची तेजी फार काळ टिकणार नाही. काही दिवसात सोन्याचा भाव कोसळणार आहे. कधी आणि काय आहे कारण? वाचा सविस्तर

सराफा बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरांची तेजी फार काळ टिकणार नाही. काही दिवसात सोन्याचा भाव कोसळणार आहे. कधी आणि काय आहे कारण? वाचा सविस्तर

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून कमी होत चाललेले सोन्याचे दर (Gold rate today) बुधवारी (29 सप्टेंबर) पुन्हा वाढलेले दिसले. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर कोसळलेले (Gold price international market) असतानाही देशातले सोन्याचे भाव वर जाताना दिसत होते. सोन्यासोबतच देशात चांदीचे भावही (Silver rate today) 362 रुपये प्रति किलो वाढल्याचं बुधवारी दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते ही तेजी फार काळ टिकणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव पुन्हा कोसळतील (Gold rates to fall) असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    तज्ज्ञांच्या मते, देशात लवकरच लाँच होणाऱ्या गोल्ड एक्स्चेंजमुळे (Gold Exchange) सोन्याचे भाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपण डिजिटली शेअर खरेदी-विक्री करतो, त्याचप्रमाणे हे गोल्ड एक्स्चेंज काम करेल. यामध्ये लोक सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी ऑर्डर देतील. त्यानंतर क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑर्डरनुसार ईजीआर (EGR) आणि फंड्सची सेटलमेंट करेल. या सेटलमेंटनंतर ईजीआर, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (Electronic Gold receipt) हे खरेदीदाराच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतील. मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) अशा प्रकारचे गोल्ड एक्सचेंज तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटचं लाँचिंग एखाद्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून किंवा मग नव्या स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून होणार आहे. सेबीने मान्यता दिल्यानंतर या ईजीआरची मिनिमम व्हॅल्यू (EGR minimum value) निश्चित केली जाईल. ईजीआरमध्ये खरेदी केल्यानंतर खरेदीदार त्याला सोन्यामध्येही रुपांतरित करू शकतील. गोल्ड एक्स्चेंजमध्ये ईजीआरमार्फत खरेदी केलेलं गोल्ड फिजिकल (EGR to Physical gold) स्वरूपात डिलिव्हरी करण्याचाही पर्याय असेल, असं सेबीनं स्पष्ट केलं आहे. गोल्ड एक्स्चेंजमुळे देशातली सोने खरेदी-विक्री अधिक पारदर्शक होईल, असा विश्वास सेबीने व्यक्त केला आहे.

    यासोबतच, गोल्ड एक्स्चेंजमुळे देशभरात सोन्याची एक निर्धारित किंमत (Gold rate structure) ठेवण्यास मदत होईल. सध्या देशात दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये उत्तरेकडच्या राज्यांच्या तुलनेत सोनं स्वस्त मिळतं.

    रोज 76 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीवेळी मिळतील 10 लाख, काय आहे LIC ची ही पॉलिसी

    तसंच, दक्षिणेकडच्या राज्यांमधला व्यवहार अधिक पारदर्शक आहे. गोल्ड एक्स्चेंज हा नॅशनल प्लॅटफॉर्म असल्यामुळे यामुळे देशभरातली सोन्याची किंमत सारखी होईल.

    देशातली सध्याची सोन्याची किंमत (Gold Rate today)

    दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची (99.9%) किंमत आज 45,123 रुपये प्रति तोळा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1,739 डॉलर प्रति औंस आहे.

    देशातले चांदीचे नवे दर (Silver rate today)

    दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचे दर 58,825 रुपये प्रति किलो आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 22.26 डॉलर्स प्रति औंस आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Gold, Gold and silver prices today, Gold price