मुंबई, 08 डिसेंबर: सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली जाते, खास करुन भारतात सोनेखरेदीला विशेष पसंती आहे. आपल्या देशात सोन्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोनेखरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यापूर्वी आजचा सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
MCX वर सोन्याचांदीचा दर
MCX वर आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे तर चांदी स्वस्त झाली आहे. आज, बुधवार 8 डिसेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर फेब्रुवारीसाठी फ्युचर्स गोल्डची किंमत 69 रुपयांनी वाढली आहे, अर्थात सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचा भाव 48,129.00 रुपयांवर आहे. तर मार्चच्या डिलिव्हरीच्या चांदीची वायदा किंमत 74.00 रुपयांनी घसरून 61,754.00 वर पोहोचली आहे. आज चांदीच्या दरात 0.12 टक्क्यांची घसरण झाली आहे.
हे वाचा-Reliance चा ऐतिहसिक करार, TA’ZIZ सोबत करणार रसायनांची निर्मिती
महाराष्ट्रातील विविध शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजारांपेक्षा जास्त आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव देखील 46 हजारांपेक्षा जास्त आहे. असे असले तरीही रेकॉर्ड हायपेक्षा सोने जवळपास 8000 रुपयांपेक्षा जास्त किमतीने स्वस्त मिळत आहे. कारण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात MCX वर सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च पातळीवर होता. गुड रिटर्न आणि बँक बझार या वेबसाइट्सनुसार जाणून घ्या महाराष्ट्रातील विविध शहरातील सोन्याचा दर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 47820 रुपये | 47820 रुपये |
पुणे | 49,320 रुपये | 49,320 रुपये |
नाशिक | 49,320 रुपये | 49,320 रुपये |
नागपूर | 47820 रुपये | 47820 रुपये |
कोल्हापूर | 48,220 रुपये | 48,220 रुपये |
लातूर | 48,220 रुपये | 48,220 रुपये |
सांगली | 48,220 रुपये | 48,220 रुपये |
बारामती | 48,220 रुपये | 48,220 रुपये |
नांदेड | 48,220 रुपये | 48,220 रुपये |
जळगाव | 48,220 रुपये | 4,8220 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 46820 रुपये | 46820 रुपये |
पुणे | 46,090 रुपये | 46,090 रुपये |
नाशिक | 46,090 रुपये | 46,090 रुपये |
नागपूर | 46820 रुपये | 46820 रुपये |
कोल्हापूर | 45,920 रुपये | 45,920 रुपये |
लातूर | 45,920 रुपये | 45,920 रुपये |
सांगली | 45,920 रुपये | 45,920 रुपये |
बारामती | 45,920 रुपये | 45,920 रुपये |
नांदेड | 45,920 रुपये | 45,920 रुपये |
जळगाव | 45,920 रुपये | 4,5920 रुपये |
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
हे वाचा-दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर खरं कारण समोर
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today