सोन्याचे दर घसरले, बाजारात विक्रीसाठी आल्या सोन्याच्या खिडक्‍या!

सोन्याचे दर घसरले, बाजारात विक्रीसाठी आल्या सोन्याच्या खिडक्‍या!

सहा जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता. दरामधली ही सगळ्यात मोठी वाढ बघण्यात आली होती. सोनं 42000 वर पोहोचलं होतं.

  • Share this:

मुंबई,20 जानेवारी: सहा जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता. दरामधली ही सगळ्यात मोठी वाढ बघण्यात आली होती. सोनं 42000 वर पोहोचलं होतं. पण आता मात्र हे दर कमी आले आहेत. सध्या सोन्याचा दर 39 हजारापर्यंत आला आहे. तर 22 कॅरेट चा दर 38 हजारापर्यंत उतरलाय. सोन्याचे दर खाली आल्यामुळे ग्राहक वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण होतंय मात्र उलटच. हे दर आणखी कमी जातील या अपेक्षेने ग्राहक सोने खरेदीसाठी अजून काही वेळ घेत आहेत.

सराफा बाजारात सोन्याच्या खिडक्या विकायला आल्या आहेत. आता तुम्हाला वाटेल की सोन्याच्या दर इतका स्वस्त कधी झालं की त्याच्या खिडक्या बाजारात विकायला काढलेल्या आहेत. थांबा... थांबा या खिडक्या सोन्याच्या असल्या तरीही त्या घराला लावायच्या नाही. तर गळ्यात आणि कानात घालण्याच्या आहेत. सध्या बाजारात टझरोखा पॅटर्न' खूप गाजतोय. वास्तु शिल्पातील अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या या खिडक्या आता सोनारांना ही आकर्षित करू लागल्या आहेत. या वेगवेगळ्या वास्तु कलेतील खिडक्या अर्थात झरोखा दागिन्यांचे नवे पॅटर्न म्हणून पुढे आले आहेत. मुख्य म्हणजे या लाईट वेट ज्वेलरीमध्ये मोडतात. त्यामुळे अगदी सात ग्रॅमपासून ते चौदा-पंधरा ग्रॅमपर्यंत सहज उपलब्ध होतात. खिडक्यांवर केलेली ही नकाशी कानातही अगदी उठून दिसते. त्यामुळेच या पॅटर्नला खूपच मागणी वाढली आहे.

मुख्य म्हणजे हे दागिने तुम्ही पारंपरिक कपड्यांवरील परिधान करू शकता तर मॉडर्न आणि हटके असल्यामुळे ती कॅज्युअलवरही चांगली दिसते.सध्या खिडक्यांचे 28 ते 30 पॅटर्न पूना गाडगीळ यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यातच सध्या त्यांच्याकडे पानिपत सिनेमासाठी वापरण्यात आलेल्या दागिन्यांसह ही प्रदर्शन भरले आहे. हे पेशवेकालीन दागिने तुम्हाला अंगावरही परिधान करून पाहता येतात. हे सर्व दागिने चांदीमध्ये उपलब्ध असल्याने खरेदीही करता येतात. 22 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल. या चित्रपटासाठी 800 पारंपारिक वाटणारे नवीन डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यापैकी काही निवडक प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहेत.

First published: January 20, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या