Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, इथे वाचा बुधवारचे दर

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, इथे वाचा बुधवारचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या घसरलेल्या किंमती आणि भारतीय रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या घसरलेल्या किंमती आणि भारतीय रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात (Latest Gold Price ) प्रति तोळा सोन्याची किंमत 614 रुपयांनी कमी झाली आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 1799 रुपयांनी कमी झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते आजच्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय चलनामध्ये चढउतार सुरू असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये तशीच परिस्थिती राहिल. मॅन्यूफॅक्चरिंग पीएमआयच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार जगभरात मॅन्यूफॅक्चरिंग अॅक्टिव्हिटीज वाढत आहेत. अशामुळे सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 02 September 2020)

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 52,928 रुपये प्रति तोळावरून कमी होत 52,314 रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. प्रति तोळा सोन्याच्या दरात 614 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 51500 रुपये प्रति तोळापेक्षा खाली आले आहेत. बुधवारी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 51024 रुपये प्रति तोळा आहेत.

(हे वाचा-LPG सिलेंडरवर या महिन्यातही नाही मिळणार सबसिडीची रक्कम, वाचा काय आहे कारण)

चांदीचे नवे दर (Silver Price on 02 September 2020)

बुधवारी सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचे द 73,001 रुपयांवरून कमी होत 71,202 रुपये प्रति किलो झाले आहे. चांदीमध्ये प्रति किलो 1799 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईमध्ये चांदीचे दर प्रति किलो 66356 रुपये आहेत.

आता पुढे काय?

तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढू शकतो. कारण आर्थिक आकडेवारी सुधारत आहे. शेअर बाजारात देखील तेजी परतली आहे. कॉमेक्सवर सोने 1970 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पोहोचले आहे. डॉलरच्या रिकव्हरीमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत आहे. अमेरिकेतील मॅन्यूफॅक्चरिंग आकडेवारीमुळे सोन्यावर दबाव आहे. मॅन्यूफॅक्चरिंगचा हा दर गेल्या 2 वर्षातील उच्च स्तरावर आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 2, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading