Home /News /money /

Gold Price Today सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Gold Price Today सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या काय आहेत आजचे दर

दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 454 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलोग्रॅम चांदीचा भाव 751 रुपयांनी वधारला आहे.

  नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात आलेल्या कमजोरीमुळे आज Gold Price Today भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 454 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलोग्रॅम चांदीचा भाव 751 रुपयांनी वधारला आहे. एक्सपर्ट्सची दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीत सुधारणा आल्यानंतर अमेरिकेकडून मदत पॅकेजसाठीच्या प्रयत्नांच्या आशेने आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर वधारल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे वाचा - ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज;लवकर प्रचार सुरु करण्याची ट्विटद्वारे माहिती एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, 6 october 2020 दिल्लीत दिल्लीत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 454 रुपयांनी वाढून 51,879 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. गेल्या सत्रात अर्थात सोमवारी सोन्याचा दर 51,425 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

  हे वाचा - उच्चांकी पातळीवरुन 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दिवाळीपर्यंत काय अ

  सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मंगळवारी एक किलोग्रॅम चांदीचा भाव 751 रुपयांनी वाढून तो 63,127 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. तर सोमवारी चांदी 62,376 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. रुपयातील मजबूतीमुळे सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. परंतु डॉलर पुन्हा मजबूत झाल्यास, सोन्याचे दर आणखी वेगाने वाढू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या