सोन्या-चांदीच्या झळाळी मंगळवारीही कायम; ताजे दर इथे पाहा

सोन्या-चांदीच्या झळाळी मंगळवारीही कायम; ताजे दर इथे पाहा

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर चढे राहिल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेतही परिणाम जाणवला.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर चढे राहिल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेतही परिणाम जाणवला. (Gold Silver Rates Today)  सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत महागलेलं सोनं आणि त्यात भारतीय रुपयाची घसरलेलं मूल्य यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याचा दर (gold rate today)10 ग्रॅममाहे 239 रुपयांनी वाढला.

सोन्याबरोबर चांदीच्या दरातही तेजी आली आहे. चांदीचा दरही (Silver rate today) प्रतिकिलो 296 रुपयांनी वाढला आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी 18 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे 239 रुपयांनी वाढून

41,865 रुपये झाला. सोमवारी सोन्याचा दर 41,626 रुपये प्रति 10 ग्राम होता. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1,588 डॉलर प्रति औन्स होता.

चांदीच्या दरातही वाढ

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ झाली. मंगळवारी चांदीचे दर  (Silver Rate on 18th February 2020)प्रतिकिलो 296 रुपयांनी वाढले. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 47,584 रुपये झाला. सोमवारी हाच दर 47,288 रुपये होता. जागतिक बाजारात चांदीचे दर वाढले आणि 17.88 डॉलर प्रति औन्स झाले.

सोन्या चांदीचे दर का वाढत आहेत?

HDFC सिक्युरेटीजचे सीनिअर अॅनालिस्ट (कमोडिटीज)तपन पटेल यांनी सांगितलं की, मौल्यवान धातूंच्या दरातली वाढ  जागतिक बाजारपेठेचा परिणाम आहे. त्याबरोबर रुपयाचं मूल्य घसरल्याने सातत्याने दर चढे राहिले आहेत.

सोन्याची आयात घटली

भारत सोन्याची आयात करण्यात आघाडीचा देश मानला जातो. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीदरम्यान मात्र ही आयात 9 टक्क्यांनी कमी झाल्याचं निरीक्षण आहे. सोन्याची आयात 24.64 अब्ज डॉलर म्हणजे साधारण 1.74 लाख कोटी रुपयांचं सोनं या वर्षात आयात करण्यात आलं.

वाचा - ईडीच्या ताब्यात रग्गड सोनं, चांदी आणि रोकड, अशी झाली कारवाई

यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये 27 अब्ज डॉलर एवढ्या मूल्याचं सोनं भारतात आयात करण्यात आलं होतं.

गेल्या दहा महिन्यात सोन्याची आयात 9 टक्क्यांनी घट झाली आहे. खरं तर लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोन्याची मागणी वाढते. त्या दोन महिन्यांदरम्यान आयातीतही वाढ झाली होती. पण ती अल्पजीवी ठरली.

जानेवारीत आयात पुन्हा कमी झाली. 31.5 टक्क्यांनी आयात घटली. त्यामुळे आता मागणी-पुरवठ्यात तफावत सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहे.

 वाचा - 'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2020 05:50 PM IST

ताज्या बातम्या