सोन्याचे भाव घटले, रुपया मजबूत होताच चांदीच्या झळाळीला ग्रहण
सोन्याचे भाव घटले, रुपया मजबूत होताच चांदीच्या झळाळीला ग्रहण
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घटल्यात. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 41,201 रुपयांवरून 41,019 रुपये झाला. मंगळवारीही सोन्याच्या भावात प्रतितोळा 162 रुपयांची घट झाली होती. सोमवारपर्यंत सोन्याचे भाव सातत्यानं चढे होते.
नवी दिल्ली, 29 जानेवारी: सोनं आणि चांदीच्या शौकिनांना दिलासा मिळाला आहे. सोन्या चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्यानं बुधवारी बाजारात सोन्याचे भाव कोसळले. दिल्ली सराफा बाजारात प्रती तोळा 182 रुपयांची घट झाली. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झालीय. त्यामुळे चांदी शौकिनांची चांदी होणार आहे. चांदीची किंमत प्रतिकिलो 1,083 रुपयांनी घटली आहे.
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घटल्यात. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 41,201 रुपयांवरून 41,019 रुपये झाला. मंगळवारीही सोन्याच्या भावात प्रतितोळा 162 रुपयांची घट झाली होती. सोमवारपर्यंत सोन्याचे भाव सातत्यानं चढे होते.
चांदी शौकिनांची चांदी
सोन्याच्या किमतीबरोबर चांदीच्या किमतीत मोठी घट झाली. चांदीची मागणी कमी झाल्यानं चांदीचे भाव चांगलेच कोसळले आहेत. चांदी प्रतिकिलो 47,693 वरून थेट 46,610 रुपयांवर आलीय. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी मजबूत झाला. सुरुवातीला रुपया 10 पैसे वाढून 71.21 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला. बाजारात तेजी आल्यानं रुपया मजबूत झाला आहे.
सोन्याचा होणार लिलाव
मण्णापुरम फायनान्स उत्तर प्रदेश, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यातील अनेक शहरांमध्ये 17 फेब्रुवारीपासून सोन्याचा लिलाव करणार आहे. लिवावासाठी जवळपास 50 केंद्र निवडण्यात आली आहेत. हरियाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेशात कंपनीने सेंटर बनवलेत. यात रांची, गुडगाव, रोहतास, बोकारो, धनबाद, हजारीबाग, जमशेदपूर, आग्रा, गौतम बुद्ध नगर, फरीदाबाद आणि मेवातचा समावेश आहे.
अन्य बातम्याSBIच्या ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी डेडलाईनटाटाने केली नवीन इलेक्ट्रिक SUV लाँच, किंमतही आवाक्यातBUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.