सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर उतरले, चांदी महागच; सोमवारचे दर इथे पाहा

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर उतरले, चांदी महागच; सोमवारचे दर इथे पाहा

सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. सोन्याचे दर उतरले, पण चांदीचा भाव मात्र चढाच राहिला. आजचे दर इथे पाहा

  • Share this:

नवी दिल्ली, 9 डिसेंबर : सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. (Gold Prices Today)आज सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 32 रुपयांनी घटला. चांदीचा Silver Prices Today दर किलोमागे 46 रुपयांनी वाढला. सोन्याचे दर Gold Prices गेले दोन दिवस घसरत आहेत. ही फार मोठी घट नसली, तरी जागतिक बाजारपेठेत उतरणारे सोन्या-चांदीचे दर आता देशातल्या बाजारपेठेत दिसू लागले आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग घट होताना दिसते आहे. सोमवारी सोन्याचा दर दहा ग्रॅमला 38,574 रुपयांवरून खाली येत 38,542 रुपये झाला. शुक्रवारच्या तुलनेत 74 रुपयांनी भाव कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,462 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.60 डॉलर प्रति औंस एवढी होती. चांदीचे दर मात्र शुक्रवारच्या तुलनेत वाढले आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 44,645 रुपयांवरून वाढून 44691 रुपये झाला.

मागणी कमी हे आहे कारण

तीन वर्षात पहिल्यांदाच यंदा सोन्याची मागणी कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार जगभरातून सोन्याची मागणी कमी झाली आहे.

भारतातही जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी तब्बल 32 टक्क्यांनी कमी झाली. आर्थिक मंदी आणि स्थानिक बाजारात सोन्याच्या दराचा उच्चांक या कारणांमुळे सोने खरेदी फारशी झाली नाही. मागणी घटली. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत सोन्याची आयात 66 टक्क्यांनी कमी झाली आहे.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

-----------------

अन्य बातम्या

महागडा iPhone फक्त 14,199 रुपयांत, भरघोस सूट मिळण्याची संधी फक्त आजच

बंदी असलेल्या Porn साइट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा, अॅक्सेसचे प्रमाण वाढले

नवा ट्विस्ट, भाजपच्या बैठकीला गेलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

नवीन मोबाईलवर मिळतोय 1 किलो कांदा मोफत! बाजारात आली हटके ऑफर

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 9, 2019, 5:59 PM IST
Tags: goldsilver

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading