सोनं उतरलं; चांदीच्या किमतीतही मोठी घट; हे आहेत गुरुवारचे दर

सोनं उतरलं; चांदीच्या किमतीतही मोठी घट; हे आहेत गुरुवारचे दर

सोन्याच्या किमतीत सलग दोन दिवस आलेली तेजी आता थांबली आहे. भारतीय रुपयाचं वाढलेलं मूल्य आणि जागतिक बाजारपेठेत पडलेल्या सोन्याच्या किमती यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : सोन्याच्या किमतीत सलग दोन दिवस आलेली तेजी आता थांबली आहे. भारतीय रुपयाचं वाढलेलं मूल्य आणि जागतिक बाजारपेठेत पडलेल्या सोन्याच्या किमती यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आहेत. राजधानी दिल्लीत आज एक तोळा सोन्याच्या दरात (Gold Spot price 5 December) 74 रुपयांनी घट झाली. चांदीच्या दरात (Silver Price Today) मोठी घट झाली. चांदीचा भाव किलोमागे 771 रुपयांनी कमी झाला.

गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचे दर घटले. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 39,059 रुपयांवरून घसरून 38,985 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला.

चांदीच्या किमतीत मात्र मोठी घट झाली. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात (Silver Spot Price in Delhi)चांदीचा दर 46,310 रुपये किलोवरून 45,539 रुपये किलो एवढा झाला.

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. त्यामुळेच सोन्या- चांदीच्या दरात घट झाली आहे. त्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारांतल्या सोन्याच्या किमतीवरही होतो आहे.

भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशात आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर सोनं आयात केलं जातं. वर्षभरात 800 ते 900 टन सोनं आयात केलं जातं. मुख्यतः आभूषणं आणि दागिन्यांसाठी सोन्याची खरेदी देशात होते.

-------------------------

अन्य बातम्या

महिलांना सव्वा लाख रुपये देणारी 'ती' सरकारी योजना Fake

RBI लवकरच बदलणार ATM संबंधीचे नियम; ग्राहकांवर होणार हा परिणाम

'पोझ कमी कर आणि थोडी बॅटिंग कर', मुंबईकर क्रिकेटपटूनं घेतली पुणेकराची फिरकी

LIVE सामन्यात गोलंदाज झाला जादूगार! चेंडूनं नाही तर रुमालानं केली कमाल

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 5, 2019, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading