मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rates : पुन्हा एकदा सोन्याची झळाळी उतरली, 694 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold Rates : पुन्हा एकदा सोन्याची झळाळी उतरली, 694 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold Price on 7 October 2020: सोन्याचांदीच्या आजच्या नवीन किंमती जारी झाल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 694 रुपयांनी उतरली आहे.

Gold Price on 7 October 2020: सोन्याचांदीच्या आजच्या नवीन किंमती जारी झाल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 694 रुपयांनी उतरली आहे.

Gold Price on 7 October 2020: सोन्याचांदीच्या आजच्या नवीन किंमती जारी झाल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 694 रुपयांनी उतरली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Rates) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मुल्य वधारले आहे. परिणामी देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 694 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 126 रुपयांनी वधारले आहेत. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर 50000 रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेट्सबरोबर आर्थिक प्रोत्साहन पॅकेज संदर्भातील वार्ता स्थगित केल्यानंतर भारतात लगेच दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत 470 रुपये किंवा 0.9 टक्क्यांनी उतरली. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 50,088 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 7th October 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 694 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे भाव 51,215 रुपये प्रति तोळा झाले आहेत. मंगळवारी दिल्लीत या शुद्धतेच्या सोन्याचा भाव 51909 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात देकील सोन्याचे भाव उतरते आहेत. याठिकाणी दर 1890 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

चांदीचे नवे दर (Silver Price on 7th October 2020)

सोन्याच्या बरोबर उलट प्रकार चांदीच्या किंमतीत पाहायला मिळाला. आज चांदीचे दर वधारले आहेत. बुधवारी चांदीचे भाव 126 रुपये प्रति किलोने वाढून 63,427 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले आहेत. मंगळवारी चांदीचे दर 63,301 रुपये प्रति किलोग्राम पर्यंत गेले होते.

(हे वाचा-बँकेत तुम्ही असा व्यवहार केला आहे का? मिळू शकते Income Tax विभागाची नोटीस)

तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचून आता 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. येणाऱ्या काही दिवसात किंमती अशाच राहण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण किंवा मोठी वाढ पाहायला मिळणार नाही. दिवाळीमध्ये देखील सोन्याचे दर  50000-52000 रुपये प्रति तोळाच्या आसपास असतील.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today