Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

यंदा सोन्याच्या किंमतीत सुमारे 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील केंद्रीय बँका आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले आहे. यंदा सोन्याच्या किंमतीत सुमारे 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली.

मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची किंमती आज 137 रुपयांनी वाढून 10 ग्रॅमची किंमत 51 हजार 585 झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत 1302 रुपयांनी वाढ होऊन. चांदीचे दर 70 हजार 139 रुपये प्रति किलो झाले आहेत. डॉलरचे उतरलेले मुल्य आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) द्वारे आणखी कमी व्याजदर होण्याबाबतचे संकेत मिळाल्यामुळे सोने मजबुत झाले आहे. अमेरिकेत सोन्याचा वायदे भाव 2 टक्क्यांनी वाढले आहे.

वाचा-स्वस्त सोनेखरेदीची आज शेवटची संधी, असा घ्या मोदी सरकारच्या योजनेचा फायदा

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी

मोदी सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी (Buy Gold with Modi Govt scheme) मिळणार आहे. यावर्षीची ही शेवटची संधी असेल. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान लागू करण्यात येत आहे. हे बाँड 8 सप्टेंबर रोजी इश्यू करण्यात येतील. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना सोने फिजिकल स्वरूपात मिळत नाही, मात्र फिजिकल गोल्डपेक्षा ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.

वाचा-सोन्यावर मिळतोय गेल्या 5 महिन्यांमधील सर्वाधिक डिस्काऊंट, तुम्हालाही आहे संधी

सोन्याच्या किंमती 28 टक्क्यांनी वाढल्या

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील केंद्रीय बँका आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले आहे. यंदा सोन्याच्या किंमतीत सुमारे 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई आणि व्याजदराबाबत फेडरल रिझर्व्हने उचललेल्या पावलांमुळे जगभरात दीर्घकाळ तरलता (Liquidity) टिकून राहिल. या निर्णयामुळे अनेक श्रेणीतील मालमत्ता वर्गामध्ये तेजी राहिल. सोन्यासह अन्य मौल्यवान धातू आणि कोर्स इक्विटीज मध्येही तेजी पाहायला मिळेल. दुसरीकडे सध्या सोन्यासाठी सर्वात मोठी जोखीम कोरोना व्हायरस लशीची उपलब्धता आणि स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 31, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या