Gold Rate today 28 september : मार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली; वाचा ताजे दर

Gold Rate today 28 september : मार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण, पहिल्यांदाच प्रति तोळा 50 हजारांखाली; वाचा ताजे दर

Gold Rate today 28 september : ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 6820 रुपयांची घसरण झाली. मार्चनंतरही सोन्याच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : वायदा बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 6820 रुपयांची घसरण झाली. मार्चनंतरही सोन्याच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीसह पहिल्यांदाच सोनं प्रति तोळा 50 हजारांखाली आलं आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 380 आहे.

तर, एमजीएक्सवर सोमवारी सकाळी 10.20च्या सुमारास ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचे दर 0.14 टक्क्यांनी म्हणजेच 69 रुपयांनी घसरत 49 हजार 600 . याशिवाय, एमसीएक्सवर डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचे दर सध्या 0.13 टक्क्यांनी म्हणजेच 63 रुपयांनी घसरत 49,585 झाले आहेत.

वाचा-Gold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर

दुसरीकडे, दुसरीकडे, सोमवारी सकाळी चांदीच्या वायदा बाजारातील किमतींमध्ये घसरण झाली. सोमवारी सकाळी 10.35 वाजता एमसीएक्सवर डिसेंबरचा चांदीचा भाव 0.75 टक्के म्हणजे 444 रुपये घसरून 58 हजार 583 झाला. याशिवाय चांदीच्या जागतिक वायदे बाजारातही घसरण दिसून आली.

वाचा-1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

जागतिक बाजारात सोन्याचे दर

जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.08 टक्क्यांनी म्हणजे 1.40 डॉलरने घसरून 1,864.90 डॉलर प्रति औंस झाले. त्याशिवाय सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औंस 1,861.11 डॉलर प्रति डॉलर आहे.

वाचा-कमी दरात धान्य मिळवण्यासाठी आहेत फक्त 2 दिवस! लगेच करा हे काम नाहीतर होईल नुकसान

जागतिक बाजारात चांदीचे दर

जागतिक स्तरावर चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लूमबर्गच्या मते, सोमवारी सकाळी, कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक भाव 0.40 टक्क्यांनी म्हणजेच 0.09 डॉलर खाली घसरून 23 डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर चांदीच्या जागतिक बाजारभावातील किंमत 22.89 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या