Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात घसरण, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

Gold Price Today: सोने दरात घसरण, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

सोन्याच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वर्षात सोन्याचा भाव 60000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचण्याचा अंदाज आहे.

    नवी दिल्ली, 18 जानेवारी : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सोन्याच्या (Gold prices Today) दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सकाळी सोन्याचा दर फेब्रुवारीच्या फ्यूचर ट्रेड 40 रुपयांच्या घसरणीसह 48,685.00 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याउलट चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. मार्चमधील फ्यूचर ट्रेड 260.00 रुपयांच्या वाढीसह 65,024.00 रुपयांवर ट्रेड करत होता. दिल्लीतील आजचा 18 जानेवारी 2021 गोल्ड रेट (Gold Price Today) - 22 कॅरेट सोने - 48130 रुपये 24 कॅरेट गोल्ड - 51500 रुपये चांदीचा दर - 65000 रुपये दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. आज अमेरिकेत सोन्याचा दर 1.61 डॉलरच्या वाढीसह 1,828.99 डॉलर प्रति औंस होता. तर, चांदी दरातही वाढ झाली. सोन्याच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वर्षात सोन्याचा भाव 60000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जवळपास 50000 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.

    (वाचा - काळा पैसाविरोधात सरकारची मोठी कारवाई; आता तुम्हीही दाखल करू शकता तक्रार)

    जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे भारतासह संपूर्ण जगभरात आर्थिक व्यवहारात अनिश्चितेचं वातावरण होतं. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून, अनेक गुंतवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडे मोठा कल होता. त्यामुळे सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. ऑगस्ट 2020 पासून सोन्याचे दर  प्रति 10 ग्रॅम 7,000 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही प्रतिकिलो 12,500 रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या कोरोना लशीच्या चांगल्या, सकारात्मक बातमीमुळे इतर आर्थिक हालचाली वाढल्या आहेत, त्यामुळे सोन्याच्या किंमतीत घट नोंदवली जाऊ शकते, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या