मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold rate: वायदे बाजारात सोन्याच्या भावात 9000 ची घसरण; पाहा काय आहेत लेटेस्ट दर?

Gold rate: वायदे बाजारात सोन्याच्या भावात 9000 ची घसरण; पाहा काय आहेत लेटेस्ट दर?

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वायदे बाजारात सोनं चांगलंच झळकत होतं. आता मात्र पिवळ्या धातूला थोडी उतरती कळा लागली आहे. अक्षय तृतीयेसारखा सण झाला तरी या आठवड्यात सोन्याचे दर घसरलेलेच होते. पाहा Latest gold price

नवी दिल्ली, 15 मे: सोन्याच्या दरामध्ये (Gold price today) या आठवड्यात सातत्याने घट होताना दिसून आली. वायदे बाजारात सोन्याचे दर 600 रुपये प्रती तोळा एवढे कमी झाले आहेत. सराफा बाजारातही सोन्याच्या भावात घसरण झालेली अनुभवायला मिळाली. गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचं संकट आणि पाठोपाठ घसरलेली अर्थव्यवस्था पाहता लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. त्यामुळे भाव चढे होते. ते आता या महिन्यापासून उतरू लागले आहेत.

गेल्या सोमवारी MCX वर सोन्याचा वायदे बाजारातला दर 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता. आठवडाभर दर घसरत होता. आता शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 47,300 या पातळीवर स्थिर झाला आहे. शुक्रवारीही सोन्याच्या दरात घसरण झाली. MCX वर सोने वायद्याचा दर 100 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे आठवड्याभरात ही विक्रमी घसरण झाली आहे.

वाचा- Mutual Fund-FD मध्ये मर्यादेपेक्षा जास्त डिपॉझिट नको, येईल इन्कम टॅक्सची नोटीस

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वायदे बाजारात सोनं चांगलंच झळकत होतं. त्याचा दर MCX नुसार   56191 प्रति दहा ग्रॅम एवढा पोहोचला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरात सोन्याने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले. 43 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाले. गेल्या वर्षीच्या या सर्वोच्च भावाची तुलना केली तर सोन्याचा भाव 25 टक्क्यांनी उतरला आहे.  MCX नुसार 47300 रुपये प्रति 10 ग्राम असा सध्याचा स्थिरावलेला दर आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 8900 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे.

वायदे बाजारात सोन्याची घसरण

  दिवस                सोनं (MCX जून वायदा)

<< सोमवार            47951/10 ग्राम

<< मंगलवार           47633/10 ग्राम

‌‌<< बुधवार              47482/10 ग्राम

<< गुरुवार             47438/10 ग्राम

<< शुक्रवार            47340/10 ग्राम

 वाचा -Gold Price Today: अक्षय्य तृतीयेदिवशी उतरलं सोनं, सातत्याने कमी होतायंत किंमती; हा आहे नवा दर

या आठवड्याभरता सोन्याचा वायदा 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. याचे परिणाम प्रत्यक्ष सोने खरेदीवरही झाले आहेत. सराफा बाजारातले सोन्याचे दरही घसरले आहेत. अक्षय तृतीयेसारखा सोनं खरेदीचा दिवस असूनही सोन्याला अपेक्षित दर मिळाला नाही.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today