Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव उतरला; काय आहे आजचा रेट

Gold Price Today: सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव उतरला; काय आहे आजचा रेट

आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोने दर (Gold Price Today) 176 रुपयांच्या तेजीसह 47,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी : आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोने दर (Gold Price Today) 176 रुपयांच्या तेजीसह 47,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 47,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मजबूती आणि कमकुमत रुपयामुळे सोने दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी घसरला आहे. सोन्यात तेजी असताना दुसरीकडे चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) 505 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी दर 61,005 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात चांदीचा भाव 61,510 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. एचडीएफसी सिक्योरिटीजने (HDFC Securities) दिल्ली सराफा बाजारातील रेट्सबाबत माहिती दिली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढला असून चांदीचा दर स्थिर आहे. घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.

    वाचा - मस्तच! 'हा' स्टॉक ठरला मल्टिबॅगर; एक लाख रुपयांचे झाले 15 लाख

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - Gold Loan पैसे उभारण्याचा सोपा मार्ग; कोणत्या बँकेत किती व्याजदर? चेक करा डिटेल

    दरम्यान, देशामध्ये कोरोना संक्रमणाची (Coronavirus Latest Update in India) स्थिती अजूनही कमी झालेली नाही आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) लोकं त्रस्त आहेत. हा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात (एप्रिल ते डिसेंबर 2021) दुपटीपेक्षा अधिक होऊम 38 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या