• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोने दरात वाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने दरात वाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा लेटेस्ट रेट

आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोने दरात काहीशी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोने वायदा दर 46,543 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोने दरात काहीशी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोने वायदा दर 46,543 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. MCX वर सोन्याचा वायदे भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 0.08 टक्क्यांनी वाढला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकदारांकडून गोल्ड स्पॉट मागणीत नवीन स्थिती निर्माण झाल्याने सोने दरात वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलरमध्ये कमी आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा 23 सप्टेंबरनंतरचा उच्चांक आहे. 22 कॅरेट गोल्ड रेट - - मुंबई - प्रति 10 ग्रॅम 45,500 रुपये - दिल्ली - प्रति 10 ग्रॅम 45,570 रुपये - चेन्नई - प्रति 10 ग्रॅम 43,890 रुपये - कोलकाता - प्रति 10 ग्रॅम 45,880 रुपये - पुणे - प्रति 10 ग्रॅम 44,790 रुपये - नागपूर - प्रति 10 ग्रॅम 45,500 रुपये

  Record: सप्टेंबरमध्ये UPI द्वारे झाले इतक्या लाख कोटी रुपयांचे 3.65 अब्ज व्यवहार

  जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे. सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
  Published by:Karishma
  First published: