मुंबई, 17 मार्च : सोनं कधी स्वस्त होणार अशी वाट पाहणाऱ्यांसाठी आता सोन्याने चांगलाच झटका दिला आहे. सोन्याने आता तब्बल 60 हजारांचा भाव गाठला आहे. RTGS GST चा दर हा तब्बल 60283 इतका झाला आहे. त्यामुळे सोनं विकणाऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आले आहे, तर गुंतवणूक करणाऱ्यांचा खिसा आता चांगलाच खाली होणार आहे.
एकीकडे महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता लग्नसराईचे दिवस येऊन ठेपले असताना सोन्याला चांगलीच झळाळी चढली आहे. सोन्याचे दराने आता 60 हजारांचा दर गाठला आहे. RTGS GST दरानुसार सोन्याचा भाव हा आता 60 हजार 283 इतका झाला आहे.
गुढीपाडव्याला सोनं कसं खरेदी करणार?
महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. मराठी नववर्षारंभ मानला जाणारा गुढी पाडवा हा सण काही दिवसांवर आला आहे. या दिवशी महाराष्ट्रात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष आहे.
या दागिन्यांना आहे विशेष मागणी
आता बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.