Home /News /money /

3 महिन्यांत 6 हजारानं वधारले सोन्याचे दर, येत्या काही दिवसात इतकं महागणार

3 महिन्यांत 6 हजारानं वधारले सोन्याचे दर, येत्या काही दिवसात इतकं महागणार

कोरोना व्हायरसचा सोन्या-चांदीवर परिणाम, ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोनं-चांदी तेजीत.

    मुंबई, 28 फेब्रुवारी : लग्न सराईच्या दिवसांमध्ये सोन्याचे भाव दिवसेंदिवस वधारत चालले आहेत. सोन्याचे दर गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 6 हजार रुपयांनी वाढल्याचं सांगितलं जात आहे. 38 हजारहून थेट 42 हजार 600 पर्यंत सोन्याचे दर पोहोचल्यानं आता लग्न सराईच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. सोन्याचे दर इतकं वधारणाचं कारण कोरोना व्हायरस असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव असाच राहिला तर पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर 46 हजारांवर जाण्याची शक्यता असल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. कोरोनाचा परिणाम चीनच नाही तर जगभरात जाणवू लागला आहे. मंदीचं सावट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भारतासह जगाची अर्थव्यवस्था जेव्हा अस्थिर होते तेव्हा स्थिर गुंतवणुकीसाठी ग्राहक सोन्याकडे वळतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली जाते असंही सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास सोनं 6 हजार रुपयांनी वधारलं आहे. हेही वाचा-नोटबंदीच्या जुन्या प्रकरणांमुळे भरणार मोदी सरकारची तिजोरी, काय आहे प्लॅन? दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 43 हजार 513 रुपये प्रतितोळे होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 649 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18.05 डॉलर प्रतिऔंस होती. चीनच्या कोरोना व्हायरसचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित वाटतेय. या कारणानेच घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. चीनबरोबरच दक्षिण कोरिया, मध्यपूर्व आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ माजली आहे. अनेक देशांतून कोरोना व्हायरसबद्दल अलर्ट आले आहेत. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारातंही चिंतेचं वातावरण आहे. हेही वाचा-अलर्ट! SBI ग्राहक असाल तर उद्यापर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर खातं होणार फ्रीज
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Gold market, Gold prices, Gold rate, Money

    पुढील बातम्या