मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price today : सोने-चांदीच्या दरात घसरण, चेक करा काय आहेत नवे दर?

Gold Price today : सोने-चांदीच्या दरात घसरण, चेक करा काय आहेत नवे दर?


दिल्लीत सोन्याचा भाव आज (Gold rate today) 402 रुपयांनी घसरून 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील व्यापारात सोन्याची किंमत 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

दिल्लीत सोन्याचा भाव आज (Gold rate today) 402 रुपयांनी घसरून 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील व्यापारात सोन्याची किंमत 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

दिल्लीत सोन्याचा भाव आज (Gold rate today) 402 रुपयांनी घसरून 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील व्यापारात सोन्याची किंमत 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : दिल्ली सराफा बाजारात आज म्हणजेच 17 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 65,746 रुपये प्रति किलोवर बंद झाला, HDFC सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

सोन्याची किंमत

दिल्लीत सोन्याचा भाव आज (Gold rate today) 402 रुपयांनी घसरून 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील व्यापारात सोन्याची किंमत 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. चांदीचा भाव (Silver rate today) 528 रुपयांनी घसरून 65,218 रुपये प्रति किलोवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,857 डॉलर प्रति औंस आणि चांदी किंचित वाढून 25.03 डॉलर प्रति औंस झाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉट गोल्ड प्राईजसह सोन्याच्या किमती मजबूत आहेत. ते म्हणाले की बुधवारी स्पॉट गोल्ड 0.37 टक्क्यांनी वाढून 1,857 प्रति औंसवर ट्रेड करत होते.

शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर

सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा?

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today