मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold-Silver Rate today : सोने-चांदीच्या दरात घसरण, वाचा नवे दर?

Gold-Silver Rate today : सोने-चांदीच्या दरात घसरण, वाचा नवे दर?

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव (Gold Rate today) 195 रुपयांनी घसरून 46,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या भावाबरोबर चांदीचा भावही (Silver Rate today) 569 रुपयांनी घसरून 61,763 रुपये प्रति किलो झाला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 25 नोव्हेंबर : लग्नसराईनिमित्त सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव (Gold Rate today) 195 रुपयांनी घसरून 46,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे हे घडले आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 46,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

चांदीचा भाव 569 रुपयांनी घसरला

सोन्याच्या भावाबरोबर चांदीचा भावही (Silver Rate today) 569 रुपयांनी घसरून 61,763 रुपये प्रति किलो झाला आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 61,194 रुपये प्रति किलो होता. गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलर (Doller vs Rupees) च्या तुलनेत 15 पैशांनी घसरून 74.55 वर आला.

Explainer : चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे गुणधर्म कोणते?

सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा?

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

ATM कार्डची मुदत संपल्यानंतर तुम्हाला नवं कार्ड मिळालं नाही तर काय करायचं?

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Money