Gold Price Today: मागील चार दिवसांत सोने दरात तिसऱ्यांदा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: मागील चार दिवसांत सोने दरात तिसऱ्यांदा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे. चलनात आलेल्या कमजोरीदरम्यान सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता, जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : देशातील वायदा बाजारात आज सोन्याच्या दरात स्थिरता पाहायला मिळाली. परंतु चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी सोन्याचा दर 0.04 टक्क्यांनी घसरुन 50,677 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात 1 टक्क्याची वाढ झाली आहे. चांदीचा दर 61,510 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतरही अनेक जाणकार सोन्याच्या दीर्घकालीन दरांबाबत सकारात्मक आहेत. अमेरिकेत लवकरच प्रोत्साहन आर्थिक पॅकेजची (Stimulus Package) घोषणा होऊ शकते. त्याशिवाय डॉलरही कमकुवत होण्याची शक्यता आहे. चलनात आलेल्या कमजोरीदरम्यान सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता, जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

(वाचा - बँक खात्यात पैसे जमा करताना, काढताना लागणार इतका चार्ज)

अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणूक (USA Presidential Eelection) आणि फेडरल रिझर्व्ह पॉलिसी (US Federal Reserve) बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सतर्क असून राष्ट्रपती निवडणूकांकडे गुंतवणूकदारांच्या नजरा आहेत. दुसरीकडे गेल्या 5 आठवड्यांपासून युरोपात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे चिंता वाढली आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्यावर दबाव वाढू शकतो.

(वाचा - घर खरेदीसाठी चांगली संधी; फेस्टिव्ह सीजनमध्ये 'या' बँकांकडून व्याजदर कपात)

Published by: Karishma Bhurke
First published: November 2, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या