Gold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आज काय आहे गोल्ड रेट

Gold Price Today: मागील दोन दिवसात 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आज काय आहे गोल्ड रेट

सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव (Gold Price Today) 0.40 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price today) घसरण पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून: गेल्या आठवड्यात सततच्या घसरणीनंतर आज सोने दरात काहीशी वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत सोने दरात जवळपास 1600 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव (Gold Price Today) 0.40 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price today) घसरण पाहायला मिळत आहे.

सोने-चांदी दर (Gold-Silver Price) -

आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच एमसीएक्सवर ऑगस्ट वायदे भाव 0.40 टक्के म्हणजेच 183 रुपयांनी वाढून 46,882 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर जुलै चांदीच्या वायदे भावात घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर 110 रुपयांनी घसरुन 67,488 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात 15 महिन्यातील सर्वात मोठ्या घसरणीच्या नोंदीनंतर आज दर उच्च स्तरावर आहे. अमेरिकी फेड रिझर्व्हने गेल्या आठवड्यात लवकरच व्याज दर वाढणार असल्याचं सांगितलं होतं. इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर अनेक महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याचा परिणाम सोने दरावरही पाहायला मिळाला.

(वाचा - Yoga Day: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे)

आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चेन्नईत 48380 रुपये, मुंबईत 47210 रुपये, कोलकातामध्ये 48900 रुपये, बेंगळुरूमध्ये 47890 रुपये, लखनऊमध्ये 50320 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका ट्रेड करत आहे.

(वाचा - Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल)

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' ने ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या app द्वारे केवळ सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल करता येऊ शकते. वस्तूचं लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा असल्यास ग्राहक याचीही तक्रार या app वर करू शकतात. या app वर तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच ग्राहकांना याबाबत माहिती मिळेल.

Published by: Karishma Bhurke
First published: June 21, 2021, 1:19 PM IST

ताज्या बातम्या