सोनं आणखी स्वस्त, 13 हजारांपेक्षा जास्त दराने घसरलं; पाहा Latest Gold Price

सोनं आणखी स्वस्त, 13 हजारांपेक्षा जास्त दराने घसरलं; पाहा Latest Gold Price

दिल्ली सराफा बाजारात आज 31 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today)188 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. अनेक दिवसांच्या चढ-उतारानंतर सोन्याचे भाव आता 44000 रुपयांहून खाली आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : भारतीय बाजारात सोन्याच्या दरातील घसरण सुरूच आहे. दिल्ली सराफा बाजारात आज 31 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today)188 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. अनेक दिवसांच्या चढ-उतारानंतर सोन्याचे भाव आता 44000 रुपयांहून खाली आले आहेत. तर चांदीचा भावही (Silver Price Today) कमी झाला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 44,113 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 63,212 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Markets) आज सोने दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

सोन्याचे नवे दर (Gold Price, 31 March 2021) -

दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 188 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 43,925 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा दर 44,113 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. दिल्ली सराफा बाजारात सोनं 7 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च 57,008 रुपयांवरुन आता 13,083 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली आलं आहे.

(वाचा - PAN-Aadhaar Linking: इनकम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट हँग,SMSद्वारे असं करा लिंक)

चांदीचा आजचा दर (Silver Price, 31 March 2021) -

चांदीच्या किंमतीत आज 771 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदी भाव 62,441 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च 77,840 रुपयांवरुन 15,399 रुपये प्रति किलोग्रॅमने घसरले आहेत.

(वाचा - कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी;1 एप्रिलपासून कामाची वेळ बदलणार,काय आहे सरकारचा प्लॅन)

सोन्यात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणांदरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयांत आलेल्या कमजोरीमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 20 पैशांनी घसरुन 73.58 रुपये इतका आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: March 31, 2021, 7:06 PM IST

ताज्या बातम्या